Shukra Gochar in Tula : सप्टेंबर महिना ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी ठरणारा आहे. आज (दि. २ सप्टेंबर) दुपारी १ वाजून ५१ मिनिटांनी सौंदर्य, सुख आणि समृद्धीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह स्वतःच्या 'तुला' राशीत विराजमान झाला आहे. यापूर्वी शुक्र कन्या राशीत भ्रमण करत होता. आता तुळ प्रवेश करताच तब्बल ७ राशींचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजपासून पुढील काही दिवस या भाग्यवान राशींच्या व्यक्तींना करिअर, आर्थिक आघाडी आणि वैयक्तिक संबंधांमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील. जाणून घेऊया या ७ राशींबद्दल...
मेष राशीच्या जातकांसाठी शुक्र गोचर दिवस अत्यंत अनुकूल सिद्ध होतील. नोकरदारांना नवीन जबाबदारी मिळू शकते किंवा चांगल्या कंपनीतून जॉब ऑफर येण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर करार अंतिम होतील. उत्पन्नात वाढ झाल्याने आर्थिक अडचण दूर होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.
कर्क राशीसाठी हा काळ आनंदाची पर्वणी घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांना नवीन करारांमधून मोठा फायदा संभवतो. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील आणि मानसिक शांतता लाभेल.
कन्या राशीच्या जातकांना धनलाभाचे योग आहेत. दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्यात परस्पर विश्वास व प्रेम अधिक दृढ होईल.
शुक्राचे भ्रमण स्वराशीत (तुला) होत असल्याने या राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात अनोखे तेज आणि आत्मविश्वास पाहायला मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. नोकरी व व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. नातेसंबंधांतील गैरसमज दूर होऊन आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल.
धनु राशीवर शुक्राच्या गोचराचा प्रभाव प्रेम आणि पैसा दोन्ही बाबतीत शुभ ठरेल. उत्पन्नात भर पडेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाललेली आर्थिक ओढाताण थांबेल. जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
मकर राशीच्या जातकांना करिअरमध्ये उच्च पद आणि यश मिळण्याचे योग आहेत. व्यापाऱ्यांना नवीन प्रकल्पातून चांगला नफा मिळेल. या काळात तुम्ही एखाद्या मौल्यवान वस्तूची खरेदी करू शकता. विशेष म्हणजे, उत्पन्न आणि खर्च यांच्यात योग्य समतोल साधण्यात तुम्ही यशस्वी राहाल.
कुंभ राशीच्या जातकांसाठी आजपासूनचा काळ सुखाचा राहील. व्यावसायिक आयुष्यातील अडचणी दूर होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा भांडवल गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे. घर, वाहन किंवा भौतिक सुखसोयींवर खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबासमवेत आनंदात वेळ व्यतीत होईल.