

Budh Ashlesha Nakshatra Gochar 2026: भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा प्रतिनिधी मानलं गेलं आहे. हा ग्रुह वेळोवेळी वेगवेगळ्या राशी आणि नक्षत्रात संक्रमण करून सर्व राशींवर प्रभाव टाकत असतो. येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० वाजून ४९ मिनिटांनी बुध ग्रह आपली चाल पुन्हा बदलणार आहे. बुध ग्रह आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
विशेष म्हणजे आश्लेषा नक्षत्राचा स्वामी खुद्द बुध देव आहे. ज्यावेळी एखादा ग्रह आपल्याच नक्षत्रात गोचर करतो त्यावेळी त्याचा प्रभाव दुप्पट, शक्तीखाली आणि सकारात्मक होतो. ज्योतिष शास्त्रानुसार बुधाच्या आश्लेषा नक्षत्रातील गोचरामुळे गुप्त शत्रूंवर विजय मिळतो. पैशासंबंधीच्या अडचणीत मोठा दिसाला मिळतो. करिअरमध्ये नवीन उंची गाठता येते. बुधाच्या आश्लेषा नक्षत्रातील गोचरामुळं पुढील ४ राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
बुध आश्लेषा नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक आघाडीवर अत्यंत शुभ ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होणार आहेत. दीर्घ काळापासून थांबलेली धनप्राप्ती पुन्हा सुरू होऊ शकते. करिअमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. व्यापारात नवीन डील्स होतील. प्रोफिट दुप्पट होण्याची शक्यता आहे.
मिथुन राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या बोलण्यामुळे आणि संवाद कौशल्याच्या जोरावर चांगले यश मिळेल. तुम्ही घेतलेले व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. जर तुम्ही माध्यामांमध्ये, लेखक म्हणून किंवा मार्केटिंग फिल्डमध्ये काम करत असाल तर तुमच्या पदोन्नतीची शक्यता असून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबीक जीवनात आनंद राहील.
कन्या राशीचा स्वामी ग्रह हा खुद्द बुध आहे. त्यामुळं हे गोचर कन्या राशीच्या लोकांना विशेष फलदायी असणार आहे. तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांची बदली किंवा प्रमोशनाला अनुकूल असा योग तयार होत आहे.
कुंभ राशीच्या लोकांना या गोचरमुळं आयुष्यात सकारात्मक बदल होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही प्रत्येक संकटाचा नेटाने सामना कराल. आर्थिक स्थिती मजबूत होण्यासोबतच कुटुंबासोबत धार्मिक यात्रा करण्याचा योग येऊ शकतो. तसेच आरोग्यात देखील मोठी सुधारणा होई शकते.