Shukra Gochar 2026 | ८ जूननंतर 'या' ३ राशींवर सुखाची सावली; शुक्रदेवाच्या कृपेने मिळणार आनंदाची बातमी

शुक्राची शुभ दृष्टी जीवनात सुख-सुविधा, आकर्षण, प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा आणि ऐश्वर्य घेऊन येते
Shukra Gochar 2026
प्रतीकात्मक छायाचित्र. AI-generated image
Published on
Updated on

Horoscope Venus Transit in Cancer 2026:

मुंबई : ज्‍योतिषशास्‍त्रानुसार, सुख आणि समृद्धीचे कारक मानले जाणारे शुक्रदेव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा मेष ते मीन अशा सर्वच १२ राशींवर त्याचा प्रभाव पडतो. शुक्राचे हे गोचर (राशी परिवर्तन) अनेक राशींसाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरते. ( Shukra Gochar 2026 )

शुक्राचा कर्क राशीत प्रवेश कधी?

द्रिक पंचांगानुसार, शुक्रदेव 08 जून 2026 रोजी संध्याकाळी 05 वाजून 47 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहेत आणि या राशीत ते 3 जुलै 2026 पर्यंत विराजमान राहतील. (Venus Transit in Cancer)

Shukra Gochar 2026
Guru Gochar 2026 | गुरुची चाल बदलणार; 'या' ४ राशींना मिळणार नशिबाची 'साथ'

शुक्राची कृपादृष्‍टी तीन राशींच्‍या जीवनात घडविणार सकारात्‍मक बदल

धार्मिक मान्यतेनुसार, शुक्राची शुभ दृष्टी जीवनात सुख-सुविधा, आकर्षण, प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा आणि ऐश्वर्य घेऊन येते. सध्या शुक्रदेव मिथुन राशीत असून, जून महिन्यात ते कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. कर्क राशीवर मनाचा कारक असलेल्या चंद्राचे अधिपत्य आहे. शुक्राच्या या कर्क गोचरामुळे अनेक राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत. जाणून घेऊया शुक्राचे हे गोचर कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे.

Shukra Gochar 2026
Mars Jupiter Conjunction 2026 |मंगळ-गुरुची युती घडवणार कमाल! 'या' ४ राशींना धनलाभासह मिळणार प्रगतीची सुवर्णसंधी

कर्क राश‍ीच्‍या जातकांच्‍या उत्‍पन्‍नात होणार वाढ

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक अडचणी संपुष्टात येतील आणि कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील; तसेच पदोन्नती (प्रमोशन) आणि पगारवाढीचे योग आहेत. व्यावसायिक स्थिती सुधारेल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील.

Shukra Gochar 2026
बुध ग्रहावरून आलेल्या दोन उल्कांचा शोध

कन्या राश‍ीच्‍या जातकांना होणार आर्थिक लाभ

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अत्यंत शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल आणि मानसिक त्रासातून सुटका मिळेल. व्यवसाय वाढवण्यासाठी चांगल्या संधी समोर येतील. अचानक धनलाभ झाल्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. आरोग्य उत्तम राहील. नोकरीमध्ये तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. घरात एखादी आनंदाची बातमी समजेल.

Shukra Gochar 2026
मंगळ अचानक गायब झाला, तर पृथ्वीचे काय? शास्त्रज्ञही अचंबित

मकर राश‍ीच्‍या जातकांना मिळणार उत्पन्नाचे नवीन स्त्रोत

मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर उत्तम परिणाम घेऊन येईल. या काळात तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. करिअरच्या दृष्टीने एक सकारात्मक वळण येऊ शकते. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना शुभ समाचार मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश राहतील. व्यापारात प्रगती होईल. काही व्यापाऱ्यांना नवीन डील किंवा मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची पूर्ण साथ लाभेल. प्रलंबित कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news