Shani Vipreet Rajyog 2025 : ३० वर्षांनंतर शनीचा 'विपरीत राजयोग': या राशींचे 'अच्छे दिन' सुरू! गुरुचीही लाभेल कृपा

सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत भ्रमण करत असून, नोव्हेंबर महिन्यात याच राशीत तो मार्गी होईल.
Shani Vipreet Rajyog 2025
प्रातिनिधिक छायाचित्र. Flie Photo
Published on
Updated on

Shani Vipreet Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, देवगुरू बृहस्पती (गुरू) कर्क राशीत प्रवेश करताच, मीन राशीत असलेल्या शनीसोबत 'विपरीत राजयोगा' ची निर्मिती करत आहेत. यामुळे तीन राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. कर्मफलदाता शनीला ज्योतिषशास्त्रात अत्यंत शक्तिशाली ग्रह मानले जाते, जो एका राशीत सर्वाधिक काळ, म्हणजे सुमारे अडीच वर्षे, वास्तव्य करतो. त्यामुळे शनीला त्याच राशीत पुन्हा येण्यासाठी सुमारे ३० वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनी गुरुची रास असलेल्या मीन राशीत वक्री अवस्थेत भ्रमण करत असून, नोव्हेंबर महिन्यात याच राशीत तो मार्गी होईल. शनीच्या या स्थितीमुळे इतर ग्रहांसोबत त्याची युती किंवा दृष्टीसंबंध तयार होऊन शुभ-अशुभ राजयोग निर्माण होत आहेत. यापैकीच एक म्हणजे कर्क राशीतील गुरुसोबत शनीने तयार केलेला 'विपरीत राजयोग'.

गुरु-शनीच्या संयोगाने झालेला राजयोग काही राशींसाठी अत्यंत फलदायी

गुरू ५ डिसेंबरपर्यंत कर्क राशीत राहणार असल्याने, हा राजयोग याच तारखेपर्यंत कायम राहील. गुरु-शनीच्या संयोगाने तयार झालेला हा राजयोग अनेक राशींसाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो. विशेषतः शनी सध्या गुरूच्या राशीत आणि नक्षत्रात असल्याने, या योगावर गुरूचा प्रभाव अधिक दिसून येईल.

Shani Vipreet Rajyog 2025
बलात्‍कार पीडितेच्‍या ‘जन्‍म कुंडली’संदर्भातील आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्‍थगिती, जाणून घ्‍या काय आहे प्रकरण?
AI Photo

धनु राशीच्‍या जातकांना होणार आर्थिक लाभ

धनु राशीच्या व्यक्तींसाठी 'विपरीत राजयोग' अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या अष्टम भावात गुरु उच्च स्थितीत विराजमान आहे, ज्यामुळे या राजयोगाची निर्मिती झाली आहे. गुरु आणि शनीच्या या संयोगाने बनलेला हा योग कठीण परिस्थितीतही मोठा लाभ देतो. आरोग्य चांगले राहील आणि व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येईल.गुरूची दृष्‍टी धन भावात पडणार आहे. शनी या भावाचा स्वामी आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि भविष्यासाठी बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कौटुंबिक जबाबदार्‍या तुम्‍ही चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. तिसऱ्या भावातील राहूमुळे तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल.शनी चौथ्या भावात असल्याने, भूमी, भवन आणि मालमत्तेत मोठा लाभ मिळू शकतो. परदेशातून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून मोठा नफा किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. शनी मार्गी झाल्यामुळे थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील आणि व्यापारातही चांगला फायदा होईल.

Shani Vipreet Rajyog 2025
240 crore lottery : आईच्‍या जन्‍मतारखेने उजळले मुलाचे भाग्‍य! तरुणाला लागली तब्‍बल 240 कोटींची लॉटरी
Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक राशीच्‍या जातकांना मिळणार कर्म आणि नशीबाची साथ

वृश्चिक राशीच्या जातकांसाठीही गुरु-शनीचा हा 'विपरीत राजयोग' खूपच फायदेशीर ठरू शकतो. हे वर्ष या राशीच्या लोकांसाठी आनंदाचे वातावरण घेऊन येण्याची शक्यता आहे.योग आणि परिणाम: या राशीत शनी पंचम भावात आणि गुरु भाग्य भावात (नवम) उच्च स्थितीत विराजमान आहे. त्यामुळे या जातकांना कर्म आणि नशीब दोघांचीही साथ मिळेल. नकारात्मक प्रभाव खूप कमी होतील.गुरु द्वितीय आणि पंचम भावाचा स्वामी आहे, तर शनी तृतीय आणि चतुर्थ भावाचा स्वामी होऊन पंचमात गोचर करत आहे. या दोन्ही ग्रहांमुळे या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीशी संबंधित समस्या सुटतील आणि तुम्ही आपले धन योग्य दिशेने खर्च करण्यात किंवा गुंतवण्यात यशस्वी व्हाल.निर्णय क्षमतेत झपाट्याने वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही भविष्याबद्दल चांगले निर्णय घेऊ शकता. मालमत्तेशी संबंधित अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि घरातील कौटुंबिक वातावरण सुधारेल.

Shani Vipreet Rajyog 2025
बुध ग्रहावरून आलेल्या दोन उल्कांचा शोध
Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क राशीच्‍या जातानांसाठी ठरणार अत्‍यंत शुभकारक

कर्क राशीच्या जातकांसाठीही 'विपरीत राजयोग' अत्यंत शुभकारक ठरू शकतो. या राशीत गुरु प्रथम भावात आणि शनी नवम भावात विराजमान आहे. गुरुची दृष्टी थेट शनीवर पडत आहे. यामुळे या जातकांना अशुभ फळांपेक्षा शुभ फळे अधिक मिळण्याची शक्यता आहे.गुरु सहाव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आणि शनी सातव्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे. यामुळे हे सर्व भाव सक्रिय होतील. परिणामी, या राशीच्या जातकांना कर्जातून मुक्ती मिळू शकते आणि शत्रूंवर विजय प्राप्त होईल.नोकरीच्या क्षेत्रातही लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. शनी नवम भावात बसून तिसऱ्या भावाला पाहत आहे. यामुळे नोकरीनिमित्त बदली किंवा स्थान परिवर्तन होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळेल.वैवाहिक जीवनात सुधारणा होईल आणि अविवाहित जातकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. भाग्य भाव सक्रिय झाल्यामुळे भाग्याची तीव्र गतीने प्रगती होईल. तसेच, मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित सामान्य माहिती देतो. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news