Shani Gochar 2026: शनीदेवांची चाल बदलणार ३ राशींचे भाग्य; होणार धनलाभ?

पंचांग आणि ज्योतिश शास्त्रानुसार शनीदेव ११ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ५ वाजून १ मिनिटांनी मीन राशीत मार्गस्थ होणार आहेत.
Shani Gochar 2026
Shani Gochar 2026pudhari
Published on: 
Updated on: 

Shani Gochar 2026: शनी देवता हे न्याय आणि कर्मफळाचे देवता मानले जातात. ज्योतिष शास्त्रातील मान्यतेनुसार शनी एखाद्या व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ देतात. त्यामुळं शनीचे संक्रमण सर्व १२ राशींच्या लोकांवर प्रभाव पाडते. कधी शनी वक्री होतो अन् कामे संथ गतीने पुढे सरकतात, आव्हाने येतात. जर शनीदेवांची चाल सरळ असेल तर थांबलेली कामे पुढे सरकतात. कामात गती येण्याची शक्यता आहे.

Shani Gochar 2026
Shani Nakshatra Gochar : पुढील ८६ दिवस ६ राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण, शनि गोचरमुळे 'या' ४ राशींनी राहावे सावध

शनीची सरळ चाल

२०२६ मध्ये शनीदेव लवकरच आपली चाल बदलणार आहेत. ११ डिसेंबरला शनी मीन राशीत मार्गी होणार आहे. या दिवसांपासून शनीची चाल ही सरळ सुरू होणार आहे. शनीची ही सरळ चाल जवळपास २४१ दिवस राहणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसा शनी मार्गी होण्याने काही राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतील. विशेषकरून वृषभ, मकर आणि तूळ या दतीन राशींच्या लोकांना हा काळ दिलासा देणारा आणि नव्या शक्यता घेऊन येणार आहे.

शनी कधी होणार मार्गी

पंचांग आणि ज्योतिश शास्त्रानुसार शनीदेव ११ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ५ वाजून १ मिनिटांनी मीन राशीत मार्गस्थ होणार आहेत. त्यापूर्वी २७ जुलै २०२६ पासून शनी वक्री अवस्थेत मार्गस्थ होते. आता जवळपास चाडेचार महिन्यांनी त्यांची वक्री चाल बदलली असून शनी आता सरळ चाल चालणार आहेत.

Shani Gochar 2026
AI in religious and astrology apps| धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषविषयक ॲप्सची चलती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढतोय

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांना शनीचे हे गोचर चांगले संकेत देत आहे. या काळात नशीब साथ देण्याची शक्यता आहे. दीर्घ काळापासूनची जे काम पूर्ण करण्यासाठी मेहनत करत आहात ते काम पूर्ण होईल अन् त्यात यश मिळेल.

नोकरी करणाऱ्या लोकांना कामात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची देखील शक्यता आहे. आर्थिक स्थिती या काळात पहिल्यापेक्षा चांगली राहण्याचे संकेत आहेत. उत्पन्न आणि खर्च याचे संतुलन साधू शकाल.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी शनी मार्गी होण्याचा आर्थिक स्तरावर मोठा फायदा होणार असं मानलं जात आहे. या काळात पैसा आणि जुन्या अडचणी हळू हळू दूर होतील. जर तुमचे कोणाकडे दीर्घकाळापासून पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे.

व्यापार करण्याऱ्या लोकांसाठी या काळात लाभाच्या अनेक नव्या संधी निर्माण होतील. जुन्या व्यावसायिक योजनांवर पुन्हा काम करण्याची संधी मिळेल. पैशासंबंधीच्या अडचणी कमी होतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.

Shani Gochar 2026
Shani Nakshatra Gochar : पुढील ८६ दिवस ६ राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण, शनि गोचरमुळे 'या' ४ राशींनी राहावे सावध

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांना शनीची ही सरळ चाल करिअर आणि आर्थिक स्थितीच्या दृष्टीकोणातून सकारात्मक मानली गेली आहे. या काळात तुमच्या कष्ट आणि गुणवत्ता यांना ओळख मिळेल. जे लोक दीर्घ काळापासून प्रमोशनची वाट पाहत आहेत त्यांना प्रमेशन मिळण्याची संधी आहे. व्यापारात स्थिती हळू हळू बळकटी येईल. जुन्या संपर्कांचा फायदा होण्याची शक्यता आहे.

काय करायचे उपाय?

  • शनिवारी दिवसा पिंपळाच्या झाडाच्या खाली मोहरीच्या तेलाचे दिवे लावा

  • शनी देवांचा मंत्र ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जाप करा

  • गरजू लोकांना काळे तीळ, उडीद डाळ आणि इतर उपयोगी वस्तूंचे दान करा

  • वृद्धांना, गरीबांना, गरजूंना मदत करा

  • आपले काम इमानदारीने करा, कोणावर अन्याय करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.