Shani Nakshatra Gochar : पुढील ८६ दिवस ६ राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण, शनि गोचरमुळे 'या' ४ राशींनी राहावे सावध

Shani Nakshatra Gochar :शनिदेवांच्या नक्षत्र गोचरामुळे काही राशींच्या करिअर, संपत्ती आणि आरोग्‍याबाबत सकारात्मक बदल पाहायला मिळतील
Shani Nakshatra Gochar
Shani Nakshatra Gochar 2026AI-generated image
Published on: 
Updated on: 

Shani Nakshatra Gochar : न्यायाचे देवता असणारे शनि देव जेव्हा आपल्या गतीत बदल करतात, तेव्हा त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव सर्वांवरच पडतो. सध्या मीन राशीमध्ये शनिदेव स्वतःच्याच नक्षत्रात विराजमान आहेत. हिंदू पंचांगानुसार, शनिदेव सध्या उत्तर भाद्रपद नक्षत्रात गोचर करत आहेत. शनिदेवांचे हे स्व-नक्षत्र गोचर आगामी ८ फेब्रुवारी २०२७ च्या सकाळपर्यंत असणार आहे. उत्तर भाद्रपद नक्षत्र हे मीन राशीच्या अंमलाखाली येते आणि सध्या शनिदेवदेखील मीन राशीतच विराजमान आहेत. अशा स्थितीत शनीचे उत्तर भाद्रपद नक्षत्रात असणे अत्यंत प्रभावी मानले जात आहे.

शनिदेवांच्या उत्तर भाद्रपद नक्षत्रातील गोचर ठरणार महत्त्‍वपूर्ण

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्मफलदाता शनिदेवांच्या या नक्षत्र गोचरामुळे काही राशींच्या नशिबात करिअर, संपत्ती आणि आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडणार आहेत; मात्र त्याच वेळी काही राशींसाठी हा काळ थोडा कठीण ठरू शकतो. शनिदेवांच्या उत्तर भाद्रपद नक्षत्रातील या गोचरामुळे कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणत्या राशींनी सावध राहण्याची गरज आहे, याचा सविस्तर वेध घेऊया.

Shani Nakshatra Gochar
Navapanchama Yoga : १२ नोव्हेंबरला गुरु-चंद्राच्या युतीतून नवपंचम योग! ३ राशींना होऊ शकतो धनलाभ

सहा राशींसाठी अत्‍यंत लाभदायक

शनिदेवांचे उत्तर भाद्रपद नक्षत्रातील हे पुढील ८६ दिवस एकूण ६ राशींच्या जातकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे, तर उर्वरित ४ राशींच्या लोकांनी या काळात विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

Shani Nakshatra Gochar
कुंभ AI Photo

कुंभ राशीच्या जातकांना धनलाभाचे योग

शनीच्या या गोचर प्रभावामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय करिअरच्या मोर्च्यावरही काही उत्तम व आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

Shani Nakshatra Gochar
Venus vs Mercury | ‘बुध’ सूर्याच्या अधिक जवळ असूनही ‘शुक्र’ जास्त उष्ण का?
Shani Nakshatra Gochar
मिथुन AI Photo

मिथुन राशीच्‍या जातकांना मिळेल नवीन संधी

हा गोचर काळ तुमच्यासाठी कमाईचे नवे मार्ग आणि नवनवीन संधी घेऊन येणार आहे. आर्थिक समृद्धीचे दरवाजे उघडतील.

Shani Nakshatra Gochar
कन्या AI Photo

कन्या राशीला व्‍यवसायात लाभेल यश

शनीचे हे गोचर तुमच्या आयुष्यात आनंदाची नवी झुळूक घेऊन येईल. तुमचे व्यावसायिक आयुष्य (करिअर) तसेच प्रेम जीवन अत्यंत सुखकर राहील.

Shani Nakshatra Gochar
Astrology Predictions 2026: गुरु-मंगळ ग्रहाचे वर्चस्व, २०२६ वर्ष भारतासह जगासमोरील आव्हाने वाढविणार!
Shani Nakshatra Gochar
तूळ AI Photo

तुळ राशीच्या जातकांच्‍या कुटुंबात आनंदाचे वातावरण

शनीच्या कृपेने तुमच्यासाठी सर्वत्र अनुकूल आणि सकारात्मक वातावरण तयार होईल. कुटुंबात सुख-शांति आणि आनंदाचे साम्राज्य राहील.

Shani Nakshatra Gochar
वृषभAI Photo

वृषभ राशीच्या जातकांसाठी अडचणी होतील कमी

तुमच्या जीवनातील जुने कष्ट व अडचणी कमी होतील. घरामध्ये भरभराट आणि हसतखेळत आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल.

Shani Nakshatra Gochar
मकर file photo

मकर राशीच्या जातकांचे मन राहिल प्रसन्न

आर्थिक घडामोडी आणि पैशांच्या व्यवहारांच्या बाबतीत तुम्हाला चांगला लाभ होईल. मन प्रसन्न राहील आणि तुम्ही स्वतःला ऊर्जावान व आनंदी अनुभवाल.

कोणत्या राशींनी सतर्क राहणे आवश्यक?

ज्योतिषीय गणनेनुसार, शनिदेवांचे हे नक्षत्र गोचर धनु, कर्क, सिंह आणि मेष या चार राशींच्या जातकांसाठी काहीसा कठीण काळ घेऊन येऊ शकते. शनीच्या या गोचर स्थितीदरम्यान या राशींच्या लोकांनी प्रत्येक पावलावर विशेष काळजी व सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.