

Shani Rashifal Saturn Transit 2026 : ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायप्रिय आणि कर्मफलदाता ग्रह मानले जाते. शनीच्या चालीत बदल होतो, तेव्हा त्याचा थेट प्रभाव सर्व १२ राशींवर पडतो. सध्या शनी देव मीन राशीत विराजमान आहेत. तसेच, ते बुध ग्रहाच्या 'रेवती' नक्षत्राच्या पहिल्या पदात गोचर करत आहेत. पण लवकरच शनीचे नक्षत्र पद बदलणार आहे. शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या सर्व जातकांवर पाहायला मिळेल.
हिंदू पंचांगानुसार, २ जुलै २०२६ रोजी कर्मफलदाता शनी देव रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या पदात प्रवेश करणार आहेत. याचाच अर्थ, येत्या २३ दिवसांपर्यंत शनी देव रेवती नक्षत्राच्या पहिल्याच पदात राहतील. शनीचे बुध नक्षत्रातील हे गोचर काही राशींचे भाग्य उजळवणारे ठरणार आहे. जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल...
तुला राशीच्या जातकांसाठी शनीचे बुध नक्षत्रातील गोचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात नफा वाढवण्यासाठी तुम्ही आखलेली रणनीती यशस्वी ठरेल.विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जात आहे.करिअरच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत, सहज यश मिळेल. या काळात तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील.
शनीचे बुध नक्षत्रातील गोचर मिथुन राशीच्या जातकांसाठी लाभदायी सिद्ध होऊ शकते. आईसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी शुभ ठरेल. अभ्यासात तुमचे मन एकाग्र होईल आणि सकारात्मक परिणाम मिळतील.बिझनेस करणाऱ्यांना एखादा मोठा नफा किंवा मोठी डील मिळण्याची शक्यता आहे.धनलाभाचे योग असून आर्थिक स्थिती उत्तम राहील.
कर्क राशीच्या जातकांसाठी शनीचे हे नक्षत्र गोचर एखादी मोठी गोड बातमी घेऊन येऊ शकते.पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आणि शुभ मानला जात आहे. आरोग्याची साथ लाभेल, कोणतीही मोठी आजारपणं त्रास देणार नाहीत.भाऊ-बहिणींसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.व्यापारात मोठा नफा मिळण्याचे योग आहेत, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल.