Rahu Gochar 2026 : कुंभ राशीत राहुचा ३१ दिवसांचा प्रवास; 'या' ३ राशींना अचानक धनलाभाचे योग!

ज्योतिषशास्त्रात राहु ग्रहाला माया, अचानक घडणाऱ्या घडामोडी आणि सांसारिक इच्छांचा कारक मानले जाते
Rahu Gochar 2026
Rahu Gochar 2026file photo
Published on: 
Updated on: 

Rahu Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रात राहु ग्रहाला माया, अचानक घडणाऱ्या घडामोडी आणि सांसारिक इच्छांचा कारक मानले जाते. सध्या राहु ग्रहाचे भ्रमण शनिदेवांच्या राशीत सुरू आहे. कुंडलीत राहुची चाल शुभ असल्यास व्यक्तीला काम आणि व्यवसायात प्रचंड प्रगती मिळते. ज्‍योतिषशास्‍त्रानुसार, ५ डिसेंबर २०२६ च्या संध्याकाळपर्यंत राहुचे कुंभ राशीत गोचर (भ्रमण) राहील. राहु हा नेहमी वक्री म्हणजेच उलट्या चालीने फिरतो. कुंभ राशीतील राहुच्या या भ्रमणामुळे तब्बल ३ राशींच्या जातकांसाठी येणारा काळ अत्यंत नशीबवान आणि लाभदायक ठरणार आहे.

धनु
धनु AI Photo

धनु राशीच्‍या जातकांच्‍या व्यवसायात होईल प्रगती

शनिच्या कुंभ राशीत राहुचे गोचर धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात पैशांचा ओघ वाढेल. तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला एखादी मोठी खूशखबर मिळू शकते. मन सकारात्मक ऊर्जेने भरेल आणि तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला दिसेल.

Rahu Gochar 2026
Astrology: दिवाळीपूर्वी ६ राशींचे नशीब पालटणार; बुध आणि शुक्र चालणार उलटी चाल; पाहा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?
मेष
मेष AI Photo

मेष राशीच्‍या जातकांना कोर्ट-कचेरीच्या कामात यश

मेष राशीच्या जातकांसाठी राहुचे हे गोचर वरदान ठरणार आहे. या काळात तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुमचे काही कायदेशीर किंवा कोर्ट-कचेरीचे वाद प्रलंबित असतील, तर त्यात विजय मिळण्याची चिन्हे आहेत. कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योगही जुळून येतील.

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या राशीच्‍या जातकांना जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा

कन्या राशीसाठी कुंभेतील राहुचे गोचर अत्यंत शुभ मानले जात आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. प्रॉपर्टी किंवा जमिनीत पूर्वी केलेली कोणतीही गुंतवणूक या काळात उत्तम परतावा देईल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. फक्त या काळात स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या.

Rahu Gochar 2026
Beta Pictoris b | ‘गुरु’पेक्षा ११ पट महाकाय ग्रह सापडला!

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.