Beta Pictoris b | ‘गुरु’पेक्षा ११ पट महाकाय ग्रह सापडला!

ब्रह्मांडातून आलेेल्या 'रेडिओ सिग्‍नल'वरून लागला शोध
Beta Pictoris b |
Beta Pictoris b | ‘गुरु’पेक्षा ११ पट महाकाय ग्रह सापडला!
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : पृथ्वीपासून ६३ प्रकाशवर्षे दूर असलेल्या अंतराळाच्या गाभाऱ्यातून काही रहस्यमय रेडिओ संकेत सतत येत आहेत. या गूढ आवाजांचा माग काढत वैज्ञानिकांनी एका अत्यंत थक्क करणाऱ्या सत्याचा शोध लावला आहे, ज्यामुळे खगोलशास्त्रातील एका मोठ्या रहस्यावरून पडदा उठला आहे.

सौरमंडळाबाहेर खरोखरच जीवन आहे का? किंवा ब्रह्मांडाच्या एखाद्या कोपऱ्यातून कोणी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न वैज्ञानिकांना पडला होता. पृथ्वीपासून सुमारे ६३ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एका महाकाय ग्रहावरून हे विचित्र आवाज येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या ग्रहावरून हे रहस्यमय सिग्‍नल येत आहेत, त्याला वैज्ञानिकांनी ‘बीटा पिक्टोरिस बी’ असे नाव दिले आहे.

२००८ मध्ये शोधला गेलेला हा अनोखा ग्रह आपल्या सौरमंडळातील सर्वात मोठ्या गुरु ग्रहापेक्षाही तब्बल ११ पटीने अधिक भारी आहे. हा ग्रह त्याच्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जवळपास २३.६ वर्षांचा काळ घेतो. शास्त्रज्ञ या तारा प्रणालीतून येणाऱ्या रेडिओ लहरींवर बऱ्याच काळापासून लक्ष ठेवून होते. मात्र, हे आवाज ताऱ्याचे आहेत की त्याच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचे, याबाबत संभ्रम होता. हे गूढ उकलण्यासाठी वैज्ञानिकांनी द.आफ्रिकेच्या ‘मीरकैट’ टेलिस्कोपची मदत घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news