

Panchgrahi Yog 2026
मुंबई : नवीन वर्ष २०२६ सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजेच पहिल्याच (जानेवारी) महिन्यात शनीचे स्वामित्व असलेल्या 'मकर' राशीत 'पंचग्रही योग' निर्माण होणार आहे.
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, १८ जानेवारी २०२६ रोजी जेव्हा चंद्र मकर राशीत प्रवेश करेल, तेव्हा हा दुर्मिळ योग जुळून येईल.यावेळी मकर राशीत सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे चार ग्रह आधीच विराजमान असतील आणि चंद्राच्या प्रवेशामुळे तिथे पाच ग्रहांची युती होईल. वर्षातील हा पहिलाच पंचग्रही योग चार राशींसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायी ठरणार आहे. जाणून घेवूया या राशींविषयी...
वृषभ राशीच्या जातकांसाठी हा योग अत्यंत शुभ ठरेल. उत्पन्नाची नवीन साधने विकसित होतील आणि जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमची पकड मजबूत होईल आणि दीर्घकाळापासून केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक वातावरण सुखद राहील.
या काळात कर्क राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील किंवा जुन्या कर्जातून सुटका होईल. सर्जनशील आणि संवाद क्षेत्रातील लोकांसाठी संधींची दारे उघडतील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल आणि संततीकडून आनंदाची बातमी मिळेल.
तूळ राशीच्या जातकांसाठॅ हा योग प्रगतीचे नवे मार्ग प्रशस्त करेल. करिअर, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा या तिन्ही क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल आणि नवीन करारांवर स्वाक्षरी होऊ शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता अधिक अचूक होईल.
पंचग्रह योग हा मकर राशीतच घडत असल्याने या राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात मोठी सुधारणा होईल. पैशांशी संबंधित जुने वाद संपुष्टात येतील. या काळात तुम्ही सोने, चांदी किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे संकेत आहेत. प्रभावी आणि अनुभवी व्यक्तींशी ओळखी होतील, ज्यांचा भविष्यात मोठा फायदा होईल.
टीप: वरील ज्योतिषशास्त्रावरील माहिती ही इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.