

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, समज, वाणी, तर्कशास्त्र (Logical Reasoning), व्यापार, नेटवर्किंग आणि संवादाचा कारक मानले जाते.
Mercury Transit 2026
मुंबई : २१ मार्च रोजी बुध ग्रह मार्गी होणार आहे. बुधाच्या चालीतील हा बदल अनेक राशींच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घेऊन येईल. विशेषतः वाणी आणि संवाद कौशल्यावर याचा सकारात्मक परिणाम होईल. गोष्टींमध्ये स्पष्टता येईल. काही राशींच्या जातकांना त्याचा विशेष फायदा मिळणार आहे.
जेव्हा बुध वक्री असतो, तेव्हा अनेक राशींना अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः करिअर, महत्त्वाच्या मीटिंग्स आणि प्रवासाच्या बाबतीत सावध राहणे गरजेचे असते. बुधाच्या वक्री काळात डेटा किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. प्रवासादरम्यान वाद होणे किंवा विचारांमध्ये गोंधळ निर्माण होणे असे प्रकार घडतात. यामुळे निर्णय घेण्यास विलंब होतो. व्यापारात अडचणी, आपापसातील मतभेद आणि इंटरनेट किंवा नेटवर्किंगमध्ये तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते.
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, समज, वाणी, तर्कशास्त्र (Logical Reasoning), व्यापार, नेटवर्किंग आणि संवादाचा कारक मानले जाते. जेव्हा बुध ग्रह वक्री होतो, तेव्हा या सर्व क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम दिसून येतो. मात्र, बुध मार्गी होताच सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. २१ मार्च २०२६ रोजी मार्गी झालेला बुध जून महिन्यापर्यंत याच स्थितीत राहील. यामुळे बुधाशी संबंधित समस्या हळूहळू कमी होतील. तुमची निर्णयक्षमता वाढेल, गैरसमज दूर होतील आणि व्यवसायातील अडचणी संपुष्टात येतील.आता बुध मार्गी झाल्यामुळे काही ठराविक राशींना विशेष लाभ होणार आहेत. जाणून घेवूया त्या राशींविषयी....
धनु राशीच्या व्यक्तींना एखाद्या प्रोजेक्टमध्ये केवळ संवाद कौशल्याच्या जोरावर अचानक लाभ होऊ शकतो. बुधाच्या मार्गी चालीमुळे समाजात तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
मकर राशीच्या लोकांसाठी दैनंदिन कामात सुधारणा होईल. बुध वक्री असताना ज्या गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या होत्या, त्या आता मार्गी लागतील. संवादाच्या जोरावर तुम्ही प्रगती कराल आणि व्यवसायात पूर्वीपेक्षा चांगली तेजी पाहायला मिळेल.
या राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये विशेष लाभ मिळतील. तुमच्या कल्पक विचारांमुळे (Creativity) तुम्हाला एक वेगळी ओळख मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. तुमचे प्रेमसंबंध सुधारतील. मात्र, या काळात मोठे आर्थिक निर्णय घेताना थोडी सावधगिरी बाळगणे फायद्याचे ठरेल.
टीप: वरील ज्योतिषशास्त्रावरील माहिती ही इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.