Hindu Dharam : कलियुगाचा अंत सुरू झालांय का? जगन्नाथ पुरी मंदिराशी संबंधित 'या' धक्कादायक भविष्यवाण्या

आपल्या देशात असे एक मंदिर आहे, जिथे कलियुगाच्या समाप्तीशी संबंधित अनेक भविष्यवाण्या सत्यात उतरत असल्याचे मानले जाते.
Hindu Dharam
Hindu Dharam : कलियुगाचा अंत सुरू झालांय का? जगन्नाथ पुरी मंदिराशी संबंधित 'या' धक्कादायक भविष्यवाण्याfile photo
Published on
Updated on

jagannath temple bhavishyamalika kalyug predictions end signs puri

पुढारी ऑनलाईन : कलियुगाचा अंत जवळ आला आहे का? सुमारे ५०० वर्षांपूर्वी संत अच्युतानंद दास महाराज यांनी भविष्यमालिका या ग्रंथात लिहिलेल्या जगन्नाथ पुरी मंदिराशी संबंधित अनेक भविष्यवाण्या आता खऱ्या ठरत असल्याचा दावा केला जातो. या संकेतांविषयी जाणून घेऊया.

कलियुगाचा अंत कधी आणि कसा होईल, याबाबत अनेक भविष्यवाण्या ऐकायला मिळतात. मात्र, आपल्या देशात असे एक मंदिर आहे, जिथे कलियुगाच्या समाप्तीशी संबंधित अनेक भविष्यवाण्या सत्यात उतरत असल्याचे मानले जाते. त्या भविष्यवाण्या नेमक्या काय आहेत, ते पाहूया.

Hindu Dharam
Ram Mandir Donation Controversy | धार्मिक संस्थांमधील अनियमिततेचा प्रश्न

हिंदू धर्मातील चार पवित्र धामांपैकी एक असलेले जगन्नाथ पुरी मंदिर अनेक रहस्यांनी वेढलेले आहे. ओडिशातील पुरी येथे असलेल्या या मंदिरात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची पूजा केली जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान श्रीकृष्णांची मूर्ती राधेऐवजी भाऊ-बहिणींसोबत विराजमान आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वी संत अच्युतानंद दास महाराज यांनी भविष्यमालिका या ग्रंथात अनेक भविष्यवाण्या लिहिल्या असून, त्यामध्ये जगन्नाथ पुरी मंदिराचा विशेष उल्लेख आढळतो.

लोक धर्मावर प्रश्न उपस्थित करतील

कलियुग चरमसीमेवर पोहोचल्यावर भगवान जगन्नाथांचा अपमान होईल. लोक धर्मावर प्रश्न उपस्थित करतील आणि मंदिरातील परंपरांमध्येही गोंधळ निर्माण होईल. उदाहरणार्थ, २०१५ मध्ये मूर्ती प्रतिष्ठापनेचा निश्चित वेळ असूनही हा विधी रात्री न होता दुसऱ्या दिवशी दुपारी पूर्ण झाला. काही लोक या घटनेचा संबंध या भविष्यवाणीशी जोडतात.

मंदिराचक दगड खाली पडू लागतील

मंदिरातील दगड आपोआप खाली पडू लागतील. हे मंदिर कमकुवत झाल्याचे नव्हे, तर पृथ्वीवरील वाढत्या पापांचे लक्षण असेल. स्थानिकांच्या मते, मंदिरातून दगड कोसळण्याच्या काही घटना घडल्या आहेत.

पवित्र कल्पवृक्ष कोसळेल

मंदिरातील पवित्र कल्पवृक्ष (वडाचे झाड) एका भीषण चक्रीवादळात कोसळेल, असे सांगितले होते. २०१९ मध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर ही भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा करण्यात आला.

Hindu Dharam
Badri Kedar Temple: राम मंदिरापाठोपाठ आता बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीवरही भ्रष्टाचाराचे आरोप, RTIमधून मोठा खुलासा

ध्वज समुद्रात पडेल

मंदिराच्या शिखरावरील ध्वजाशी संबंधित आहे. हा ध्वज कधीही वाऱ्यामुळे उडत नाही, अशी श्रद्धा आहे. मात्र, कलियुगात तो समुद्रात पडेल, असे भाकीत करण्यात आले होते. २०१९ मध्ये अशी घटना घडल्याचा दावा करण्यात आला.

मंदिरावरील सुदर्शन चक्र वाकडे होईल

मंदिरावरील सुदर्शन चक्राशी संबंधित आहे. प्रचंड वाऱ्यामुळे हे चक्र वाकडे होईल, असे सांगण्यात आले होते. २०१९ च्या चक्रीवादळानंतर अशा प्रकारच्या चर्चा समोर आल्या.

ध्वजाला आग लागेल

मंदिराच्या ध्वजाला आग लागेल आणि त्यानंतर मोठी आपत्ती येईल, असे भाकीत करण्यात आले होते. २०२० मध्ये ध्वजाला आग लागल्याच्या घटनेनंतर काहींनी त्याचा संबंध कोरोना महामारीशी जोडला.

मंदिराच्या शिखरावर गिधाड

मंदिराच्या शिखरावर गिधाड बसण्याशी संबंधित आहे. या मंदिरावर पक्षी उडत नाहीत किंवा विमान जात नाहीत, अशी श्रद्धा आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी गिधाड बसल्याची घटना अशुभ संकेत मानली गेली.

अंतिम भविष्यवाणी

शेवटची भविष्यवाणी रक्तवर्षावाशी संबंधित आहे. काहीवेळा आकाशातून रक्तासारख्या लाल थेंबांचा वर्षाव होत असल्याचे भासल्याचे सांगितले जाते. मात्र, याची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी झालेली नाही.

या सर्व भविष्यवाण्यांचा संबंध अनेक जण कलियुगाच्या समाप्तीशी जोडतात. हिंदू मान्यतेनुसार, कलियुगाच्या अंतिम टप्प्यात भगवान विष्णू कल्की अवतार धारण करतील आणि त्यानंतर पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल.

टीप: वरील मजकूर धार्मिक श्रद्धा आणि प्रचलित मान्यतांवर आधारित आहे. या भविष्यवाण्यांची वैज्ञानिक किंवा ऐतिहासिकदृष्ट्या निश्चित पुष्टी झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news