Vastu tips: घरात कोळ्याचे जाळे असणे शुभ आहे की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगते...

पुढारी वृत्तसेवा

घरामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.

अनेकदा घराची नीट साफसफाई करूनही आपण छतावर आणि कोपऱ्यात लागलेल्या कोळ्याच्या जाळ्यांकडे दुर्लक्ष करतो.

यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. असे म्हटले जाते की, घरात कोळ्याची जाळी जास्त असल्यास कुटुंबातील सदस्यांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वास्तू शास्त्रानुसार असे म्हटले जाते की, घरात नेहमी पैशांची कमतरता भासू शकते आणि कामात अडथळे येऊ शकतात. तसेच घरातील व्यक्तींच्या स्वभावात आळस, चिडचिडेपणा आणि नकारात्मकता वाढू शकते.

घरात नेहमी पैशांची कमतरता भासू शकते आणि कामात अडथळे येऊ शकतात. तसेच घरातील व्यक्तींच्या स्वभावात आळस, चिडचिडेपणा आणि नकारात्मकता वाढू शकते.

वास्तू शास्त्रानुसार, घराच्या कोपऱ्यात बराच काळ कोळ्याची जाळी राहिल्यास कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि हळूहळू धनहानी होऊ लागते.

देवघरात कधीही कोळ्याची जाळी लागू देऊ नका. देवाच्या फोटोंच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

स्वयंपाकघरात कोळ्याची जाळी लागणे अशुभ मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना सतत कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.

अशी मान्यता आहे की, घरात कोळ्याची जाळी लागल्याने वास्तुदोष निर्माण होतो, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो.