आज मंगळाचा मेष राशीत प्रवेश; ‘या’ राशी मालामाल; तर ‘या’ राशींना धोका

आज मंगळाचा मेष राशीत प्रवेश; ‘या’ राशी मालामाल; तर ‘या’ राशींना धोका
Published on
Updated on

[author title="चिराग दारूवाला :" image="http://"][/author]

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

१ जूनला मंगळ मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे. मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ ऊर्जा, बंधुत्व, शक्ती, धैर्य, धाडस यांचे प्रतीक आहे. मंगळ ग्रह मेष आणि वृश्चिकचा राशिस्वामी आहे. मंगळ राशीचा मेष राशीतील प्रवेश नक्कीच काही ग्रहांसाठी अत्यंत भाग्यकारक असणार आहे, तर काही राशींना मात्र सावध राहावे लागणार आहे.

मेष : कामाचा भार वाढेल

बोलताना नियंत्रण ठेवा, तसेच कामाचा ताण वाढू शकतो. तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील. प्रकृतीची काळजी घ्या. वाहनावरील खर्च वाढू शकतो. नोकरीत प्रगतीचा मार्ग सापडेल. सामधानी मानसिकता राहील, पण कौटुंबिक समस्या सतावतील. भावांचे सहकार्य मिळेल.

वृषभ : नोकरीत बदलाचे योग

नोकरीत बदलाचे योग आहेत, आणि उत्पन्न वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. तुम्हाला काही काळासाठी कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. सरकारचे पाठबळ राहील. आईच्या प्रकृतीबद्दल काही तक्रारी असतील. जीवनमान कठीण असेल, पण अडकलेले पैसे हाती येतील.

मिथुन आत्मविश्वास वाढेल

तुमच्या भरपूर आत्मविश्वास असेल. तुमच्या शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यासाठी तुमचा गौरव होईल. तुमचे बौद्धिक कार्य तुमच्यासाठी उत्पन्नाचे साधन राहील. कपड्यांवरील खर्च वाढेल. अभ्यासात रुची वाढेल. संततीच्या प्रकृतीची चिंता सतावेल. जुने मित्र भेटतील.

कर्क स्थान परिवर्तनाचे योग

मनात असमाधान आणि निराशा राहील. स्थानपरिवर्तनाचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. खर्च वाढतील. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. धार्मिक कार्यातील तुमचा सहभाग वाढेल.

सिंह मानसिक शांतता लाभेल

मानसिक शांतता लाभेल. आत्मविश्वास वाढेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. खर्च वाढतील. मित्रांच्या मदतीने नोकरी मिळेल. तुमचे बोलणे मृदू राहील. वडिलार्जित संपत्तीतून पैसे मिळतील. मुलांच्या प्रकृतीची चिंता राहील. दूरच्या प्रवासाला जावे लागण्याचे योग आहेत.

कन्या खर्च वाढतील

व्यापारात प्रगती होईल आणि उत्पन्न वाढेल. तुम्हाला शासनाची मदत होईल. व्यावसायिक कामासाठी प्रवासाला जाल. तुम्हाला व्यापारात कोणाची तरी मदत लागू शकते. जीवमान त्रासदायक असेल. आईची प्रकृती बिघू शकले. खर्चही वाढेल.

तूळ कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन

मानसिक त्रास होईल, त्यामुळे मानसिक शांतता राखण्याचे प्रयत्न करा. व्यावसायिक स्थिती सुधारेल, पण तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील. कुटुंबात धार्मिक कार्यांचे आयोजन होईल. तुम्हाला आईचा पाठिंबा असेल. आध्यात्मिक घडमोडीत रस वाढेतल. कामाच्या ठिकाणी जास्त कष्ट करावे लागतील. तुमच्या मनाविरुद्ध तुमच्यावर अधिकची जबाबदारी सोपवली जाईल.

वृश्चिक : उत्पन्न कमी आणि खर्च जास्त राहील

तुमच्या आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल. तुमचा कल धार्मिक बाबींकडे जास्त राहील. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होईल. शैक्षणिक कामांकडे लक्ष द्या. आईच्या प्रकृतीची चिंता सतावेल. तुमच्या बोलणे मधुर राहील. मित्र येतील, तसेच अपुरी कामे पूर्ण होतील.

धनू पर्यटनाच्या संधी मिळतील

तुमचे मन अस्वस्थ राहील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. शैक्षणिक कामात खंड पडू शकतो. मित्रांसोबत फिरायला जाल. दैनंदिन जीवन विस्कळित होईल. आत्मविश्वास वाढलेला असेल. कला, संगीत याकडे कल राहील. वाहन सूख मिळेल. पर्यटनाच्या संधी मिळतील.

मकर बोलताना संतुलन ठेवा

मनात आशा आणि निराशेचा खेळ सुरू राहील. कुटुंबात धार्मिक समारंभाचे आयोजन होईल. तुम्हाला गोड पदार्थ जास्त आवडतील. व्यवसायामागे अनावश्यक धावपळ होईल. कुटुंबाकडून तुम्हाला पाठबळ मिळेल. तुमची भाषा कठोर राहील, आणि तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील, त्यामुळे बोलताना संतुलन ठेवावे लागेल. संततीबद्दल काही समस्या राहतील. उत्पन्नही कमी राहील. वादविवाद वाढतील.

कुंभ धार्मिक कार्यात रस वाढेल

स्वतःवर नियंत्रण ठेवा, संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. स्थानपरिवर्तनाचे योग आहे. तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील. आरोग्याची काळजी घ्या. शिक्षण आणि संशोधन कार्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची मदत राहील. मनात निराशा आणि असमाधानाची भावना राहील. धर्मिक बाबतीत रस वाढेल.

मीन कुटुंबात वैचारिक मतभेद होतील

मन अशांत राहील, त्यामुळे मानसिक शांतता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी मिळू शकते. तुमचा स्वभाव चीडखोर होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यात माधुर्य ठेवा. आत्मविश्वास कमी होईल. कुटुंबात वैचारिक मतभेद होतील.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news