

What is Chandra Grahan Sparsh Moksha Time 2025
पं. गौरव देशपांडे
भाद्रपद पौर्णिमेस, म्हणजेच रविवार, ७/८ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) होत आहे. हे चंद्रग्रहण भारतातून पूर्ण स्वरूपात दिसणार असून, युरोपातील बर्लिन, जिनिव्हा, लंडन, पॅरिस, म्युनिक, रोम यांसारख्या शहरांत ते 'ग्रस्तोदित' स्वरूपात स्वरूपात दृश्यमान होईल. खग्रास चंद्रग्रहणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय प्रमाणवेळेनुसार, खग्रास चंद्र ग्रहणाचा स्पर्श 7 सप्टेंबर 2025 च्या रात्री 09:57 वाजता असून ग्रहण मोक्ष मध्यरात्री 01:27 वाजता आहे. हे चंद्रग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात लागत असल्यामुळे 'चंद्रग्रहे ग्रहणप्रहरादर्वाक् यामत्रयं वेधः' या वचनानुसार 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.32 पासून ग्रहणवेध सुरू होतो.
लहान मुले, अशक्त, आजारी, वृद्ध व गर्भवती स्त्रियांनी सायं. 05.10 पासून वेध पाळावेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार, या ग्रहणाचा स्पर्श रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी होईल आणि मोक्ष मध्यरात्री १ वाजून २७ मिनिटांनी होईल. या चंद्रग्रहणाचा वेध दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी सुरू होईल. लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी वेधकाळ सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुरू होईल.
निरोगी व्यक्तींसाठी ग्रहण वेध(सूतक) आरंभ कधी होतो आणि अशक्त व गर्भवती स्त्रियांसाठी ग्रहण वेध(सूतक) आरंभ कधी होतो हे त्या त्या जगातील शहरानुसार गणिताने काढून दिलेले आहे. ज्या ठिकाणी ग्रस्तोदित चंद्रग्रहण दिसत आहे त्या ठिकाणी त्या त्या गावच्या सूर्योदयापासून ग्रहणाचा वेध सुरू होतो, तशी वेळवरील तक्त्यामध्ये नमूद केले आहे.
ग्रहणकाळात भोजन, जलपान, मलमूत्र विसर्जन, अभ्यंग स्नान, झोप आणि स्त्रीसंग या गोष्टी टाळाव्यात, असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे ग्रहण पर्वकाळात या नियमांचे पालन करावे.
ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाचा विविध राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होणार आहे. तो खालील प्रमाणे....
मेष : लाभ, वृषभ: सुख, मिथुन: अपमान, कर्क: घात, सिंह: जोडीदारास त्रास, कन्या: सुख, तूळ: चिंता, वृश्चिक: व्यथा, धनु: धनप्राप्ती, मकर: धननाश, कुंभ: शरीरपीडा, मीन: हानी किंवा द्रव्यनाश