

ठाणे : येत्या रविवारी 7 सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणारे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
रविवार 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होणार आहे. रात्री 11-00 ते 12-23 संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर, तपकिरी रंगाचे दिसेल. रात्री 12-23 वाजता चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल.
उत्तररात्री 1 वाजून 27 मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल. हे खग्रास चंद्रग्रहण सर्वांना साध्या डोळ्यांनी पाहता येईल. हे खग्रास चंद्रग्रहण भारताप्रमाणेच संपूर्ण आशिया, आफ्रिका, यूरोप,आस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथून दिसेल. यापुढील चंद्रग्रहण मंगळवार 3 मार्च 2026 रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ग्रहणामध्ये शुभ-अशुभ असे काही नसते. प्रत्येकाने ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावे, असे दा. कृ. सोमण यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केेले.