

Shani Gochar 2026
नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून २०२६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षात कर्मफळदाता शनी देव मीन राशीत संचार करणार आहेत. वर्षभरात शनीची चाल मार्गी आणि वक्री राहण्यासोबतच नक्षत्र परिवर्तनही होणार आहे. शनीचे गुरुच्या राशीत (मीन) आगमन झाल्यामुळे काही राशींच्या व्यक्तींसाठी नवीन वर्ष आनंदाची पर्वणी घेऊन येईल.
२०२६ च्या सुरुवातीला शनी मीन राशीत मार्गी अवस्थेत असतील. त्यानंतर २६ जुलै रोजी ते याच राशीत वक्री होतील आणि वर्षाच्या शेवटी पुन्हा मार्गी होतील. शनीच्या या शुभ दृष्टीमुळे अनेक राशींचे नशीब चमकण्याची शक्यता आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षात शनीदेव तुळेसह तीन राशींवर विशेष कृपावर्षाव करतील.
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष प्रगतीकारक ठरेल. शनी या राशीच्या अकराव्या स्थानी विराजमान असतील. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने या काळात धनप्राप्ती आणि उत्पन्नात वाढ होण्याचे प्रबळ योग आहेत. अकरावे स्थान हे इच्छापूर्तीचे स्थान मानले जाते, त्यामुळे तुमच्या बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. नोकरीत बढतीचे अडथळे दूर होतील. कामाचे कौतुक होऊन पगारवाढ किंवा थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी मंदीचे सावट दूर होऊन अडकलेले पैसे परत मिळतील. विशेषतः रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, ट्रान्सपोर्ट आणि धातू क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठा लाभ होऊ शकतो. मुलांच्या करिअरमध्ये यश मिळेल. शनीच्या प्रभावामुळे मानसिक नकारात्मकता आणि नैराश्य दूर होईल. शनीची फळे संथ असली तरी ती कायमस्वरूपी आणि न्यायपूर्ण असतील.
ज्योतिषशास्त्रानुसार, २०२६ मध्ये शनी तुला राशीच्या सहाव्या भावात संचार करतील. यामुळे या राशीच्या व्यक्तींना शत्रूंवर विजय मिळेल आणि जुन्या आजारांपासून सुटका होईल. व्यवसायातील गुंतवणुकीतून दुप्पट नफा मिळण्याचे संकेत आहेत. सहावे स्थान नोकरीशी संबंधित असल्याने स्पर्धा परीक्षा, मुलाखती आणि नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांचे काम मार्गी लागेल. कामाच्या ठिकाणचा तणाव कमी होईल. कर्ज किंवा आर्थिक दबावातून बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे होतील. मालमत्ता, घर किंवा वाहनाशी संबंधित कामांत सुधारणा होईल. मात्र, आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी शनीचे हे गोचर अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शनी तुमच्या पराक्रम भावात म्हणजेच तिसऱ्या स्थानी असतील. यापूर्वी केलेल्या कष्टांचे अपेक्षित फळ आता मिळायला सुरुवात होईल. या काळात केलेले व्यावसायिक किंवा परदेश प्रवास फायदेशीर ठरतील. भावंडं आणि मित्रांसोबतचे संबंध सुधारतील. शनी मार्गी झाल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होऊन आळस दूर होईल. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. शिक्षणात आणि मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल आणि पूर्वी झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई होईल.
टीप : वरील ज्योतिषशास्त्रावरील माहिती ही इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.