

Union Budget 2026 Memes: आज 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत बजेट सादर केल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. काहींनी बजेटमधील घोषणांचे स्वागत केले, तर अनेक जण अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे नाराजी व्यक्त करताना दिसले. या सगळ्या प्रतिक्रियांवर मीम्स बनवले आहेत.
टॅक्स, महागाई, मध्यमवर्ग, सामान्य माणूस अशा विषयांवर आधारित मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. गंभीर आर्थिक चर्चांऐवजी अनेकांनी आपली प्रतिक्रिया विनोदाच्या माध्यमातून मांडली आहे. त्यामुळे बजेटवरील चर्चा आता केवळ विश्लेषणापुरती न राहता मनोरंजनाचाही विषय ठरली आहे.
बजेट पाहून काही युजर्सना लोकप्रिय ‘आत्माराम भिडे’ आठवले, तर काहींनी बजेटची तुलना थेट रेसिंग ट्रॅकशी केली. “आखिर कहना क्या चाहते हो?” अशा मजकुरासह मीम्स शेअर केले जात आहेत. या मीम्समधून लोक आपला राग, निराशा किंवा उपरोधिक प्रतिक्रिया हलक्याफुलक्या पद्धतीने व्यक्त करत आहेत.
फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्रामवर बजेट 2026 संदर्भातील मीम्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत. अनेक पोस्ट्सवर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा पाऊस पडत असून लोक हसत-हसत आपली मते मांडत आहेत.