

Thalapathy Vijay Net Worth 2026: तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय आता राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. 2026 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना त्याने आपल्या संपत्तीचा तपशील सादर केला आणि त्यानंतर त्याच्या संपत्तीची चर्चा देशभरात रंगली आहे.
विजयने आपल्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार संपत्तीचा सविस्तर तपशील दिला. सादर केलेल्या माहितीनुसार, विजयच्या नावावर सुमारे 404.58 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे.
त्याची पत्नी संगीता सोरणालिंगम यांच्या नावावरही सुमारे 15.51 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर त्याच्या संपत्तीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
तपशीलानुसार Indian Overseas Bank मधील खात्यात सुमारे 213.36 कोटी रुपये, Axis Bank मध्ये सुमारे 5.79 कोटी रुपयांची FD, यावरून विजयची आर्थिक ताकद किती मोठी आहे, हे स्पष्ट होते.
विजयच्या लक्झरी लाइफस्टाइलची झलकही या तपशीलातून दिसून येते. BMW 530, Toyota Vellfire यांसारख्या कार्ससह त्याच्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे. तसेच 883 ग्रॅम सोनं (1.20 कोटी रुपये), पत्नी संगीता यांच्याकडे 4 कोटींहून अधिक सोनं आणि कुटुंबाकडे सुमारे 1 कोटी रुपयांचे हिरे आहेत.
विजयकडे केवळ संपत्तीच नाही, तर त्याने विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही केली आहे. कंपन्या, ट्रस्ट, संस्थांमध्ये, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात एकूण 56 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
वर्षानुवर्षे तमिळ सिनेमात सुपरस्टार राहिल्यानंतर विजयने आता राजकारणात एन्ट्री केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.