Swiggy Hike Platform Fee: झोमॅटो नंतर स्विगीनेही प्लॅटफॉर्म फी वाढवली; ग्राहकांना किती पैसे मोजावे लागणार?

Food Delivery Platform Fee Increase: स्विगीने प्लॅटफॉर्म फी ₹14.99 वरून ₹17.58 केली असून ग्राहकांवर अतिरिक्त भार पडणार आहे. झोमॅटोनेही यापूर्वी फी वाढवली असल्याने ऑनलाइन फूड ऑर्डर महाग झाली आहे.
Swiggy Zomato Platform Fee
Swiggy Zomato Platform Fee Pudhari
Published on
Updated on

Swiggy Zomato Food Delivery Platform Fee Increase: ऑनलाइन फूड ऑर्डर करणं आता हळूहळू महाग होत चाललं आहे. कारण, Swiggy ने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली असून, काही दिवसांपूर्वीच Zomato नेही अशीच वाढ केली होती. या दोन मोठ्या कंपन्यांच्या निर्णयामुळे आता प्रत्येक ऑर्डरवर ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

स्विगीची फी किती वाढली?

स्विगीने प्लॅटफॉर्म फी 14.99 रुपयां वरून 17.58 रुपये केली आहे. म्हणजेच प्रति ऑर्डर सुमारे 2.59 रुपयांची वाढ झाली आहे. ही फी आता सर्व फूड ऑर्डर्सवर लागू झाली आहे. ही फी डिलिव्हरी चार्ज, GST आणि खाद्यपदार्थांच्या किमतींसोबत बिलात जोडली जाते.

झोमॅटोनेही फी वाढवली

Zomato नेही अलीकडेच आपली प्लॅटफॉर्म फी वाढवून 14.90 रुपये प्रति ऑर्डर केली आहे. पूर्वी ही फी कमी होती. पण आता ती प्रत्येक ऑर्डरवर ही फी आकारली जात आहे. प्लॅटफॉर्म फी म्हणजे प्रत्येक ऑर्डरवर लावला जाणारा एक फिक्स चार्ज. ऑर्डर कितीही लहान किंवा मोठी असली तरी ही फी लागते. म्हणजे तुम्ही 200 रुपयांची ऑर्डर करा किंवा 1000 रुपयांची ही फी सारखीच असते. यामुळे विशेषतः लहान ऑर्डर्सवर अधिक परिणाम होतो.

Swiggy Zomato Platform Fee
Raghav Chadha: मोबाईल डेटा न वापरता गायब होतोय; टेलिकॉम कंपन्यांचा स्कॅम? राघव चढ्ढांनी संसदेत उपस्थित केला मुद्दा

ग्राहकांना किती पैसे मोजावे लागणार?

आता साधारणपणे ग्राहकांच्या बिलात खालील वाढ केली जाणार आहे.

  • स्विगीवर: आधीच्या तुलनेत 2.59 रुपये प्रति ऑर्डर

  • झोमॅटोवर: आधीच्या तुलनेत वाढ (सुमारे ₹2-₹3 पर्यंत, शहरानुसार बदलू शकते)

जर एखादा ग्राहक महिन्याला 15-20 वेळा ऑर्डर करत असेल, तर त्याला अतिरिक्त 50 ते 100 रुपयांपर्यंत जास्त खर्च करावा लागू शकतो.

कंपन्या फी का वाढवत आहेत?

सध्या फूड डिलिव्हरी कंपन्यांचा खर्च वाढत आहे:

  • इंधनाच्या वाढत्या किमती

  • डिलिव्हरी पार्टनर्सचे पेमेंट

  • टेक्नॉलॉजी आणि अॅप ऑपरेशन खर्च

  • कस्टमर सपोर्ट

मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम डिलिव्हरी खर्चावर होत आहे.

Swiggy Zomato Platform Fee
TV Revolution: सेट-टॉप बॉक्सचा खेळ संपणार! अश्विनी वैष्णव यांनी केली मोठी घोषणा; फ्रीमध्ये पाहता येणार चॅनल्स

ग्राहकांसाठी काय बदलणार?

या वाढीचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. प्रत्येक ऑर्डर महाग होणार, लहान ऑर्डर करणं खर्चिक होणार आहे, डिस्काउंट असूनही बिल जास्त येणार. काही सबस्क्रिप्शन प्लॅन्सवर (जसे की फ्री डिलिव्हरी) सुट मिळत असली, तरी प्लॅटफॉर्म फी द्यावीच लागणार.

Swiggy आणि Zomato या दोन्ही मोठ्या कंपन्यांनी प्लॅटफॉर्म फी वाढवल्यानंतर आता ऑनलाइन फूड ऑर्डर करणं पूर्वीपेक्षा महाग झालं आहे. ही फी आता तात्पुरती नसून कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळे पुढील काळात ग्राहकांना ऑनलाइन ऑर्डर करताना थोडं जास्त बजेट ठेवावं लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news