

Stock Market Updates
भारतीय शेअर बाजार गुरुवारी (दि. ३ जुलै) वाढून खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी वाढून ८३,६०० वर तर निफ्टी ५० निर्देशांक ६० अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,५०० वर पोहोचला. आयटी आणि मेटल शेअर्समध्ये अधिक तेजी दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर टाटा स्टील, एम अँड एम, टाटा स्टील, इन्फोसिस, मारुती, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत. तर दुसरीकडे बजाज फायनान्स, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले आहेत. हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.
क्षेत्रीय निर्देशांकातील निफ्टी ऑटो, आयटी, मेटल हे टॉप गेनर्स आहेत. तर दुसरीकडे पीएसयू बँक, फायनान्सियल निर्देशांक घसरणीसह खुले झाले आहेत.
एफएसएन ई-कॉमर्स नायका शेअर्स (FSN E-Co Nykaa Share Price) ३.५ टक्के घसरला आहे.
बुधवारच्या सत्रात बाजारात तेजीनंतर अचानक झालेल्या विक्रीने सेन्सेक्स- निफ्टी घसरून बंद झाले होते. सेन्सेक्स २८७ अंकांनी घसरून ८३,४०९ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५० निर्देशांक ८८ अंकांच्या घसरणीसह २५,४५३ वर स्थिरावला होता.