

Stock Market Updates
अमेरिकेच्या टॅरिफ लागू करण्याच्या डेडलाइनच्या आधी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे मंगळवारी भारतीय बाजारात सुरुवातीलाच चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स (Sensex)- निफ्टी (Nifty) आज लाल रंगात खुले झाले. त्यानंतर लगेच सेन्सेक्स ५० अंकांनी वाढून ८३,५०० जवळ तर निफ्टी ५० निर्देशांक ११ अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,४७० वर पोहोचला.
अमेरिकेच्या व्यापार धोरणांबाबतच्या अनिश्चिततेमुळे बाजारात दबाव दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत द्विपक्षीय व्यापार करार (India US Trade Deal)Stock Market News करण्याची वेळ जवळ आल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी जपान आणि दक्षिण कोरियावर २५ टक्के टॅरिफ लागू केले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली. येथील नॅस्डॅक, एस अँड पी ५०० निर्देशांक प्रत्येकी १ टक्के घसरले. आशियाई बाजारात आज संमिश्र व्यवहार दिसून आला. तर भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट व्यवहार करत आहेत.
सेक्टर्समधील फार्मा शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून येत आहे. निफ्टी फार्मा निर्देशांक जवळपास १ टक्के घसरला आहे. तर दुसरीकडे निफ्टी बँक, मेटल तेजीत खुले झाले आहेत.
बीएसई सेन्सेक्सवर कोटक बँकेचा शेअर्स सर्वाधिक ४ टक्के वाढला आहे. त्याचबरोबर इर्टनल, एनटीपीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एशियन पेंट्स हे शेअर्स ०.५ ते १.६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर दुसरीकडे टायटनचा शेअर्स ५ टक्के घसरला. सन फार्मा, ट्रेंट, एचसीएल टेक हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत.