Stock Market Updates | सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढला, 'हे' शेअर्स तेजीत

बाजाराची तेजीत सुरुवात, कोणते शेअर्स फोकसमध्ये?
Stock Market Updates
शेअर बाजार.(File Photo)
Published on
Updated on

Stock Market Updates

मुंबई : महागाईत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने बुधवारी (दि.१४) तेजीत सुरुवात केली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ८१,६०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक १७५ अंकांनी वाढून २४,७५० वर व्यवहार करत आहे. बाजारातील तेजीत फायनान्सियल आणि आयटी शेअर्स आघाडीवर आहेत.

देशातील किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये सहा वर्षांच्या निचांकी पातळीवर आला. एप्रिलमध्ये महागाई दर ३.१६ टक्क्यांपर्यंत खाली आला. तो मार्चमध्ये ३.३४ टक्के होता. महागाई कमी झाल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून संभाव्य दर कपातीची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत.

Stock Market Updates
Retail Inflation | सर्वसामान्यांना दिलासा! किरकोळ महागाई दर ६ वर्षांच्या निचांकी पातळीवर, 'या' वस्तू झाल्या स्वस्त

Sensex Today | 'हे' शेअर्स तेजीत

टाटा स्टीलचा शेअर्स सर्वाधिक ४.७ टक्के वाढला आहे. त्याचसोबत इर्टनल, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, इन्फोसिस. एम अँड एम, एलटी हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा मोटर्स हे शेअर्स घसरले आहेत.

सर्व क्षेत्रीय निर्देशांकही हिरव्या रंगात खुले झाले आहेत. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस, आयटी, मेटल, पीएसयू बँक, रियल्टी, ऑईल अँड गॅस हे निर्देशांक वाढले आहेत.

Stock Market Updates
Stock Market | म्युच्युअल फंड एसआयपीचा नवा विक्रम

देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून खरेदीवर जोर

दरम्यान, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Domestic institutional investors) सलग तिसऱ्या दिवशी खरेदी कायम ठेवली. त्यांनी १३ मे रोजी ४,२७३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर याच दिवशी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४७६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news