

Stock Market Updates
भारतीय शेअर बाजारात दबाव कायम आहे. शुक्रवारी (दि.१८ जुलै) सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० घसरून ८२ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ८१ अंकांनी घसरून २५ हजारांवर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्सवर ॲक्सिस बँकचा शेअर्स ४ टक्क्यांनी घसरला. भारती एअरटेल, टेक महिंद्रा, इर्टनल, कोटक बँक, एचसीएल टेक, टायटन हे शेअर्स ०.५ ते १५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर दुसरीकडे टाटा स्टील, एम अँड एम, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढून खुले झाले आहेत.
मेटल, ऑटो आणि कॅपिटल गुड्स शेअर्समध्ये तेजी राहिली आहे. तर दुसरीकडे बँकिंग शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला आहे.
निफ्टीवर विप्रोचा शेअर्स (Wipro shares) २.७ टक्के वाढून २६७ रुपयांवर पोहोचला आहे. जून तिमाहीतील कंपनीचे कमाईचे आकडे चांगले राहिल्याने विप्रोचा शेअर्स वधारला आहे. गेल्या काही महिन्यांत या शेअर्समध्ये घसरण झाली होती.
मजबूत जागतिक संकेत असतानाही विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा बाजारात दबाव दिसून आला आहे. अमेरिकेतील शेअर बाजार गुरुवारी तेजीत बंद झाले होते. आशियाई बाजारातूनही सकारात्मक संकेत आहेत.
गुरुवारी (दि. १७ जुलै) सेन्सेक्स ३७५ अंकांच्या घसरणीसह ८२,२५९ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५० निर्देशांक १०० अंकांनी घसरून २५,१११ पर्यंत खाली आला होता. आजदेखील शेअर बाजारात दबाव राहिला आहे.