Stock Market Updates | विक्रमी तेजी थांबली! सेन्सेक्स- निफ्टीत घसरण, जाणून घ्या आजचे मार्केट?

कोणते शेअर्स फोकसमध्ये?
Stock Market Updates, Sensex, Nifty
आज मंगळवारी (दि.१३ मे) सेन्सेक्स- निफ्टी घसरणीसह खुले झाले. (file photo)
Published on
Updated on

Stock Market Updates

सोमवारच्या बंपर तेजीनंतर मंगळवारी (दि.१३) शेअर बाजारात घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरून ८१,६०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २०० अंकांनी घसरून २४,७२० वर आला. त्यानंतर सकाळी ९.४३ वाजण्याच्या दोन्ही निर्देशांकांची घसरण काही प्रमाणात कमी झाली होती. सेन्सेक्स ६५९ अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता.

क्षेत्रीय आघाडीवर निफ्टी बँक, ऑटो, फायनान्सियल सर्व्हिसेस, एफएमसीजी, आयटी, रियल्टी, ऑईल अँड गॅस निर्देशांक १ टक्केपर्यंत घसरले आहेत. निफ्टी फार्मा १.७ टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक १.६ टक्के वाढला आहे.

Stock Market Updates, Sensex, Nifty
Stock Market | म्युच्युअल फंड एसआयपीचा नवा विक्रम

Sensex Today | कोणते शेअर्स घसरले?

बीएसई सेन्सेक्सवर इर्टनल, इन्फोसिस, पॉ‍वर ग्रिड, कोटक बँक, एचसीएल टेक, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर दुसरीकडे सन फार्मा, टेक महिंद्रा, एसबीआय, बजाज फायनान्स हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.

पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सचा (PayTM Share Price) शेअर्स सुरुवातीला ५ टक्के घसरून ८२३ रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर त्यात काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली.

Stock Market Updates, Sensex, Nifty
व्हॉटस्अ‍ॅपद्वारे भरा ‘एलआयसी’चा हप्ता

सोमवारी भारत- पाकिस्तानमधील शस्त्रसंधीच्या (India Pakistan Ceasefire) पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने बंपर तेजी नोंदवली होती. सेन्सेक्स तब्बल २,९७५ अंकांनी वाढून ८२,४२९ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५० निर्देशांकाने ९१६ अंकांच्या वाढीसह २५ हजारांजवळ झेप घेतली होती. कालची सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची वाढ अनुक्रमे ३.७ टक्के आणि ३.८ टक्के एवढी होती. विशेष म्हणजे या तेजीमुळे दोन्ही निर्देशांकांनी १६ डिसेंबर २०२४ नंतर पहिल्यांदाच सर्वोच्च पातळीवर गाठली. तसेच ४ वर्षांतील ही सेन्सेक्स आणि निफ्टीची दुसरी मोठी तेजी ठरली.

पण आज बाजारात दबाव दिसून आला. दोन्ही निर्देशांकांची घसरणीसह सुरुवात झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news