

देशातील सर्वात मोठी असलेली विमा कंपनी एलआयसीचे कोट्यवधी पॉलिसीधारक आता त्यांचे एलआयसी पॉलिसीचे हप्ते व्हॉटस्अॅपद्वारे भरू शकतात. वास्तविक, भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) त्यांच्या ‘व्हॉटस्अॅपबॉट’ सेवेद्वारे एलआयसी पॉलिसीचे हप्ते भरण्यासाठी ही ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे.
एलआयसीच्या मते, ‘या पर्यायामुळे एलआयसी ग्राहकांना ऑनलाईन प्रीमियम भरण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल.’ नोंदणीकृत ग्राहक पोर्टल वापरकर्ते देय असलेल्या पॉलिसींचा मागोवा घेण्यासाठी एलआयसीने जाहीर केलेला व्हॉटस्अॅप नंबर वापरू शकतात. याचा वापर करून ते यूपीआय/नेट बँकिंग/कार्डद्वारे थेट ‘व्हॉटस्अॅपबॉट’मध्ये पेमेंट करू शकतात. प्रीमियमसाठी देय असलेल्या पॉलिसी ओळखण्यापासून ते पेमेंट आणि पावतीपर्यंतचा संपूर्ण ग्राहकाचा प्रवास व्हॉटस्अॅप बॉटमध्ये होतो. एलआयसीच्या ग्राहक पोर्टलवर 2.2 कोटींहून अधिक नोंदणीकृत पॉलिसीधारक आहेत. त्यापैकी दररोज 3 लाखांहून अधिक ग्राहक विविध ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी लॉग इन करतात. त्यामुळे ही सुविधा ग्राहकांना उपयुक्त ठरेल.
ज्या एलआयसी पॉलिसीधारकांनी एलआयसी पोर्टलवर त्यांची पॉलिसी नोंदणी केली आहे ते +91 8976862090 या मोबाईल क्रमांकावर ’कख’ लिहून व्हॉटस्अॅपवर या सेवांचा लाभ घेऊ शकतील. तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला विविध पर्याय मिळतील, जे तुम्हाला या सेवांचा लाभ घेण्यास मदत करतील. एलआयसी पॉलिसी सेवा निवडण्यासाठी तुम्ही यातील पर्याय क्रमांक निवडू शकता.
पोर्टलवर ऑनलाईन सेवा नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
तुमचा किंवा तुमच्या अल्पवयीन मुलांचा जीवन पॉलिसी क्रमांक.
या पॉलिसींचा हप्तेा (सेवा कर/जीएसटीशिवाय).
100 केबी पेक्षा कमी आकाराच्या पॅन कार्ड किंवा पासपोर्टचा स्कॅन केलेला फोटो .jpg किंवा .jpeg स्वरूपात असावा. तथापि, फोटो .bmp, .png, .gif आणि .tiff स्वरूपातदेखील अपलोड केल्या जाऊ शकतात.
त्यानंतर www.licindia.in वर जा आणि कस्टमर पोर्टलवर क्लिक करा.
जर तुम्ही यापूर्वी ग्राहक पोर्टलसाठी नोंदणी केली नसेल, तर ‘न्यू युजर’वर क्लिक करा.
पुढील स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या पसंतीचा युजर आयडी आणि पासवर्ड निवडावा लागेल आणि तो सबमिट करावा लागेल.
या नवीन तयार केलेल्या युजर आयडीने लॉग इन करा आणि ‘बेसिक सर्व्हिसेस - अॅड पॉलिसी’ पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या उर्वरित सर्व पॉलिसींची नोंदणी करा.
प्रीमियर सर्व्हिसेससाठी नोंदणी करण्यासाठी तीन टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण करा.
प्रीमियर सेवांसाठी नोंदणी : जर तुम्ही आधीच नोंदणीकृत वापरकर्ता असाल, तर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून एलआयसी पोर्टलवर लॉग इन करा. नंतर 3 सोप्या पायर्या फॉलो करा.
कागदपत्रांची नोंदणी, प्रिंटिंग आणि अपलोडिंग.
पोर्टल वापरकर्त्यासाठी नोंदणी करताना दिलेली जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी मूलभूत माहिती नोंदणी फॉर्ममध्ये आपोआप जोडली जाईल.
पॅन कार्ड किंवा पासपोर्टची माहिती द्या.
या टप्प्यावर, नोंदणीकृत सर्व पात्र पॉलिसीज्चे क्रमांक (तुमच्या किंवा तुमच्या अल्पवयीन मुलांच्या जीवन विमा पॉलिसीज्) दाखवले जातील.
जोडीदाराच्या जीवन विमा पॉलिसींसाठी, त्याला/तिला स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागेल.
- प्रिंट/सेव्ह फॉर्म वर क्लिक करा आणि नोंदणी फॉर्म प्रिंट करा.
- नोंदणी फॉर्मची माहिती तपासा आणि त्यावर स्वाक्षरी करा.
- स्वाक्षरी केलेल्या फॉर्मची आणि कोणत्याही एका केवायसी दस्तऐवजाची (पॅन किंवा पासपोर्ट) स्कॅन केलेला फोटो बनवा.
- स्कॅन केलेल्या प्रतिमेचा फाईल आकार जास्तीत जास्त 100 केबी असावा. स्कॅन केलेले फोटो .bmp, .png, .jpg, .jpeg, .gif Am{U .tiff यापैकी कोणत्याही एका स्वरूपात असाव्यात.
- दिलेल्या पर्यायाद्वारे नोंदणी फॉर्मवर स्कॅन केलेला फोटो अपलोड करा.
- पॅन कार्ड किंवा पासपोर्टचा स्कॅन केलेला फोटो अपलोड करा.
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर ‘सबमिट द रिक्वेस्ट’वर क्लिक करा.
- नोंदणी फॉर्ममध्ये दिलेल्या मोबाईल/ई-मेल आयडीवर एक पोचपावती एसएमएस आणि ई-मेल पाठवला जाईल.
- ही विनंती ग्राहक क्षेत्रात पडताळणीसाठी पाठवली जाईल.
- कस्टमर झोन अधिकार्याने (नोंदणीच्या तारखेपासून 3 कामकाजाच्या दिवसांच्या आत) पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला एक पोचपावती ई-मेल आणि एसएमएस पाठवला जाईल.