

Stock Market Updates
शेअर बाजारात बुधवारी (दि. १६ जुलै) चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स- निफ्टी किरकोळ वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स- निफ्टीची सुरुवात आज कमकुवत झाली होती. त्यानंतर दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स ६३ अंकांनी वाढून ८२,६३४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १६ अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,२१२ वर स्थिरावला.
अमेरिकेतील वाढत्या महागाईची चिंता सुरुवातीला भारतीय बाजारात दिसून आली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय इक्विटी बेंचमार्क घसरणीसह खुल झाले होते. पण पीएसयू बँक आणि आयटी शेअर्समधील तेजी, विदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि अस्थिरता कमी झाल्याने बाजाराला घसरणीतून सावरण्यात मदत झाली.
निफ्टी PSU Bank निर्देशांक १.८ टक्के वाढला. आयटी शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. निफ्टी आयटी ०.६ टक्के वाढून बंद झाला. निफ्टी मीडिया १.३ टक्के वाढून बंद झाला. निफ्टी आयटी ०.६ टक्के वाढला. तर दुसरीकडे मेटल आणि कॅपिटल गुड्स शेअर्समध्ये घसरण झाली.
सेन्सेक्सवर एम अँड एम, टेक महिंद्रा, एसबीआय, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, आयटीसी हे शेअर्स ०.५ ते २ टक्के वाढले. तर दुसरीकडे इटर्नल, सन फार्मा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टीसीएस, पॉवर ग्रिड हे शेअर्स ०.५ ते १.५ टक्के घसरले.
एक्सचेंजवरील आकडेवारीनुसार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (II) मंगळवारी १२० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. विदेशी गुंतवणुकीचा ओघ हा भारतीय शेअर बाजारांबद्दल सकारात्मक संकेत दर्शवतो.