Stock Market Updates | सेन्सेक्स ५७२ अंकांनी घसरून बंद, 'या' शेअर्समध्ये जोरदार विक्री

आजच्या सत्रात निफ्टी २४,७०० अंकांच्या खाली घसरला
Stock Market Updates
Stock Market Updates(Pudhari Photo)
Published on
Updated on

Stock Market Updates

आशियाई बाजारातून कमकुवत संकेत, अमेरिकेसोबत व्यापार वाटाघाटी, आयटी क्षेत्रातील नवीन नोकरकपात, विदेशी गुंतवणूकदारांकडून सततची विक्री आदी घटकांचा भारतीय शेअर बाजारावर सोमवारी (दि. २८ जुलै) दबाव दिसून आला. आजच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स त्याच्या इंट्राडे उच्चांकावरुन ७२६ अंकांनी खाली आला. तर एनएसई निफ्टी २४,७०० अंकांच्या खाली घसरला. त्यानंतर सेन्सेक्स ५७२ अंकांच्या घसरणीसह ८०,८९१ वर बंद झाला. तर निफ्टी १५६ अंकांनी घसरून २४,६८० वर स्थिरावला. रियल्टी आणि बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा जोर अधिक राहिली.

BSE Sensex Today | कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर कोटक बँकेचा शेअर्स ७.५ टक्के घसरून टॉप लूजर ठरला. त्याचबरोबर बजाज फायनान्स, भारती एअरटेल, टायटन, टीसीएस, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एम अँड एम, एसबीआय, इटरनल हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले. तर दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक हे शेअर्स तेजीत राहिले.

Stock Market Updates
UPI GST 2025 | 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर GST लागणार? केंद्राचा मोठा खुलासा...

आयटी शेअर्सवरही आज दबाव दिसून आला. निफ्टी आयटीवर विप्रो, टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा हे शेअर्स सर्वाधिक घसरले. टीसीएसच्या २ टक्के नोकरकपातीच्या घोषणेमुळेही आयटी क्षेत्रातील वाढीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

बाजारातील भयसूचकांक इंडिया VIX जवळपास ७ टक्क्यांनी वाढला. जो गुंतवणूकदारांमधील वाढती चिंता दर्शवितो.

Stock Market Updates
Step-Up SIP | ‘स्टेप-अप एसआयपी’ म्हणजे काय?

दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरुच आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) शुक्रवारी १,९७९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. याचा देशांतर्गत बाजारावर परिणाम दिसून आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news