

Stock Market Updates
भारतीय शेअर बाजार सोमवारी (दि. ७ जुलै) सपाट पातळीवर खुला झाला. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ५० अंकांनी वाढून ८३,४८० वर तर निफ्टी ५० निर्देशांक १९ अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,४८० वर पोहोचला.
क्षेत्रीय पातळीवर निफ्टी आयटी, मेटल, मीडिया हे निर्देशांक घसरले आहेत. तर एफएमसीजी, पीएसयू बँक, कन्झ्यूमर ड्युराबेल्स, ऑईल अँड गॅस हे तेजीत खुले झाले आहेत.
सेन्सेक्सवर हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी हे शेअर्स ०.५ ते १.६ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर दुसरीकडे भारत इलेक्ट्रॉनिकचा शेअर्स जवळपास २ टक्के घसरला. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इर्टनल, मारुती, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स ०.५ ते १ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
अमेरिकेने प्रस्तावित टॅरिफला विलंब होणार असल्याचे संकेत दिले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली आहे. परिणामी, सेन्सेक्स- निफ्टीत चढ-उतार राहिला आहे.
सोमवारी आशियातील शेअर बाजारांतील निर्देशांकही घसरले. दरम्यान, तेल निर्यातदार देशांची संघटना OPEC+ ने अपेक्षेपेक्षा जास्त पुरवठा सुरु केल्याने तेलाच्या किमती घसरल्या आहेत.