

Stock Market Updates
कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी (दि. १७ जुलै) सपाट पातळीवर खुला झाला. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी घसरून ८२,५०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३२ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २५,१५० वर व्यवहार करत होता. आयटी आणि फायनान्सियल शेअर्सवर दबाव दिसून आला आहे.
सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, इटर्नल, इन्फोसिस, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचसीएल टेक या शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. तर दुसरीकडे एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ट्रेंट, टाटा मोटर्स हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.
निफ्टी आयटी ०.६ टक्के घसरला आहे. LTIMindtree, टेक महिंद्रा हे आयटी शेअर्स प्रत्येकी १.७ टक्के घसरले आहे. निफ्टी फायनान्सियलवर एसबीआय लाईफ, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत.
तर दुसरीकडे आज फार्मा शेअर्समध्ये खरेदी दिसून आली आहे. निफ्टी फार्मावर नॅटको फार्मा, Ajanta Pharma, Torrent Pharmaceuticals हे शेअर्स १ ते २ टक्के वाढले आहेत.