
Stock Market Updates
इस्रायल-इराण यांच्यात सलग सातव्या दिवशी संघर्ष कायम आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.१९ जून) भारतीय शेअर बाजाराची सलग तिसऱ्या दिवशी कमकुवत सुरुवात राहिली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५० अंकांनी वाढून ८१,५०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक सुमारे २० अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,८३० वर व्यवहार करत आहे. मुख्यतः आयटी आणि बँकिंग शेअर्स घसरले आहेत.
क्षेत्रीय निर्देशांकातील निफ्टी आयटी (Nifty IT) १ टक्के घसरला. बीएसई मिडकॅप ०.४ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.१ टक्के घसरला.
सेन्सेक्सवर टायटन, एम अँड एम, एलटी, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, आयटीसी हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत. तर दुसरीकडे टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, इन्फोसिस, इंडसइंड बँक, एसबीआय, एचसीएल टेक, टीसीएस, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले आहेत.
दरम्यान, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
मध्य पूर्वेतील भू- राजकीय तणाव आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने या वर्षाच्या अखेरीस केवळ दोनवेळा व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारपेठांमध्येही घसरण झाली. त्यानंतर भारतीय बाजारातही दबाव दिसून आला.