तेजीत खुला झाल्यानंतर बाजारात चढ-उतार, कोणते शेअर्स फोकसमध्ये?

Stock Market Updates | Zomato शेअर्स तेजीत
BSE Sensex, Stock Market Updates
आज (दि. ५ सप्टेंबर) शेअर बाजारात चढ-उतार दिसून येत आहे.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बुधवारच्या घसरणीतून सावरत गुरुवारी शेअर बाजार (Stock Market Updates) हिरव्या रंगात खुला झाला. पण त्यानंतर त्यात चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स (Sensex) सुरुवातीला १५० अंकांनी वाढून ८२,४०० पार झाला होता. त्यानंतर तो लगेच ८२,४०० च्या खाली आला. तर निफ्टी (Nifty) २५,२०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. मेटल आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तसेच सिमेंट आणि नॉन बँकिंग फायनान्सियल कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहेत.

अमेरिकेतील संभाव्य आर्थिक मंदीच्या भीतीने जगभरातील बाजारात बुधवारी घसरण झाली होती. दरम्यान, गुरुवारी जागतिक बाजारात संमिश्र वातावरण असतानाही भारतीय शेअर बाजारानेही तेजीत सुरुवात केली. आज, बँका आणि ऑईल आणि गॅस क्षेत्रांसह सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात खुले झाले.

Sensex Today : कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स तेजीत आहेत. तर एचसीएल टेक, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, एलटी या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. बीएसई मिडकॅप ०.४ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.८ टक्क्यांनी वाढला आहे.

निफ्टीवर अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा कन्झ्यूमर हे शेअर्स वाढले आहेत. दुसरीकडे एचडीएफसी लाईफ, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले आहेत.

Zomato शेअर्स ६ टक्क्यांनी वाढला

विशेष म्हणजे झोमॅटोचा शेअर्स (Zomato shares price) आज ६ टक्क्यांनी वाढून २५७ रुपयांवर पोहोचला आहे.

BSE Sensex, Stock Market Updates
विक्रमादित्य निफ्टी- सेन्सेक्स! फार्मामधील 'हा' शेअर ठरला ऑगस्टमध्ये स्टार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news