

Stock Market Update
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि.१० जुलै) सुरुवातीलाच चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स- निफ्टी तेजीत खुले झाले होते. पण त्यानंतर लगेच त्यात घसरण झाली. सकाळी ९.४० वाजता सेन्सेक्स (Sensex) १२० अंकांनी घसरून ८३,४०० वर तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) ३५ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २५,४४० वर व्यवहार करत होता. आयटी आणि फार्मा शेअर्सवर दबाव राहिला आहे.
सेन्सेक्सवर एम अँड एम, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, सन फार्मा, इन्फोसिस, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले आहेत. तर दुसरीकडे टाटा स्टील, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.
सेक्टर्समध्ये निफ्टी आयटी ०.५ टक्के घसरला. एचसीएल टेक, विप्रो, Mphasis, टेक महिंद्रा, इन्फोसिस हे आयटी शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. निफ्टी फार्मा, ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांकही लाल रंगात खुले झाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात छोट्या व्यापारी भागीदार देशांना टॅरिफ लागू करण्याबाबत सूचना जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील बाजारात तेजी राहिली. त्यानंतर आशियाई शेअर बाजारातील निर्देशांकांनीही तेजीत सुरुवात केली आहे.