Stock Market Today: शेअर बाजाराची दमदार सुरुवात! सेन्सेक्स 350 अंकांनी वाढला; IT आणि बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात करत सेन्सेक्सने 350 हून अधिक अंकांची झेप घेतली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराने तेजीसह सुरुवात केली. जागतिक घडामोडी आणि काही सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. बाजार उघडताच सेन्सेक्सने 350 हून अधिक अंकांची झेप घेतली, तर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्येही मजबूत तेजी पाहायला मिळाली.

मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स मागील बंद पातळी 76,802 वरून थेट 77,160 अंकांवर उघडला. सुरुवातीलाच 350 हून अधिक अंकांची वाढ झाली. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) बँक निफ्टी निर्देशांकही वाढीसह उघडला. ऑटो, FMCG आणि IT क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला.

विशेषतः गेल्या काही दिवसांपासून दबावाखाली असलेल्या IT क्षेत्रात आज सकारात्मक वातावरण दिसून आले. इन्फोसिस, HCL टेक, टेक महिंद्रा यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक आणि ICICI बँक यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

गेल्या आठवड्यातील चढ-उतारांनंतर बाजाराने पुन्हा सावरण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. जरी शुक्रवारी बाजारात घसरण झाली होती, तरी संपूर्ण आठवड्याचा विचार करता सेन्सेक्स आणि निफ्टीने जवळपास 1.7 टक्क्यांची वाढ नोंदवली होती.

मोठ्या कंपन्यांपेक्षा मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये अधिक ताकद दिसून आली आहे. गुंतवणूकदारांनी मध्यम आणि लहान कंपन्यांमध्ये दाखवलेला विश्वास बाजारातील सकारात्मकतेचे संकेत मानला जात आहे.

दरम्यान, संरक्षण क्षेत्रातील शेअर्स गेल्या आठवड्यात चर्चेचा विषय ठरले होते. देशातील संरक्षण उत्पादन आणि निर्यातीबाबत वाढलेला आत्मविश्वास यामागील प्रमुख कारण मानले जात आहे. पॅरस डिफेन्स, BEL, HAL, माझगाव डॉक, भारत डायनॅमिक्स आणि कोचीन शिपयार्ड यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

Stock Market Today
Qatar Gas Hub Explosion: कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पात भीषण स्फोट; 54 जखमी, 18 जण बेपत्ता, जगभरात खळबळ

या आठवड्यात बाजाराच्या दिशेवर परिणाम करणारे काही महत्त्वाचे घटक गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील. त्यामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती, परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी-विक्री, अमेरिकेतील महागाईचे आकडे आणि मोठ्या अमेरिकन कंपन्यांचे तिमाही निकाल यांचा समावेश आहे.

विशेषतः अमेरिकेतील PCE महागाईचा डेटा आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित घडामोडी भारतीय बाजारावर प्रभाव टाकू शकतात. त्याचबरोबर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्रीही बाजारासाठी चिंतेचा विषय ठरू शकते.

तांत्रिक विश्लेषणानुसार निफ्टीसाठी 24,100 हा स्तर महत्त्वाचा मानला जात आहे. हा स्तर कायम राखण्यात यश मिळाल्यास निर्देशांक 24,500 च्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र घसरण झाल्यास 23,700 ते 23,800 हा भाग महत्त्वाचा आधार ठरू शकतो.

सध्या बाजारातील वातावरण सकारात्मक असले तरी गुंतवणूकदारांनी जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या किंमती आणि परदेशी गुंतवणुकीचा प्रवाह यावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कारण या घटकांमुळे बाजाराची दिशा बदलू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news