Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेंसेक्स 125 अंकांनी वाढला, निफ्टी 26,100 वर
Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. आज सेंसेक्सने 125 अंकांच्या वाढीसह सुरुवात केली, तर निफ्टी 40 अंकांनी वाढत 26,100 च्या वर पोहोचला.
IT शेअर्समध्ये दमदार खरेदी असल्याने बाजाराला मोठा सपोर्ट मिळाला. इंडेक्स साधारण 1% वर होता. NBFC आणि बँकिंग स्टॉक्समध्येही चांगली तेजी दिसली. मात्र ऑटो इंडेक्समध्ये घसरण झाली. मीडिया, मेटल आणि फार्मा इंडेक्सही लाल रंगात होते.
सेंसेक्स–निफ्टीची ओपनिंग
सेंसेक्स 89 अंकांनी वाढत, 85,320 वर उघडला
निफ्टी 54 अंकांनी वाढत, 26,122 वर उघडला
बँक निफ्टी 129 अंकांनी वाढत, 58,996 वर उघडला
टॉप गेनर्स आणि लूजर्स
टॉप गेनर्स:
Tech Mahindra, Infosys, HCL Tech, Wipro, Indigo, Eicher Motors
टॉप लूजर्स:
BEL, M&M, TMPV, Grasim, PowerGrid, Ultratech Cement
IT शेअर्समध्ये खरेदीचा जोर असल्याने निफ्टीला सर्वाधिक आधार मिळाला.
ग्लोबल मार्केटकडून सकारात्मक संकेत
आशियाई बाजार तेजीत होते आणि GIFT Nifty 100 अंकांनी वाढत 26,175 वर ट्रेड करत होता. Dow Futures देखील 100 अंकांनी वाढला होता, ज्यामुळे ग्लोबल सेंटीमेंट सुधारले होते.
आजचे प्रमुख ट्रिगर्स
डाऊ व नॅस्डॅक तेजीसह बंद
कच्चे तेल 1 महिन्याच्या नीचांकी पातळीवर — $62 च्या खाली
सोन्याचा भाव ₹1,500 ने वाढला
MSCI Global Standard Indexमध्ये बदल लागू
22 डिसेंबरपासून Tata Motors PV बाहेर, Indigoची सेंसेक्समध्ये एंट्री
FIIs ची ₹3,148 कोटींची मोठी विक्री
DIIs ची सलग 60 दिवस जोरदार खरेदी
MSCI बदल लागू
आजच्या क्लोजिंगनंतर MSCI Global Standard Indexमध्ये मोठे बदल होणार आहेत.
Fortis, GE Vernova T&D, Paytm, Siemens Energy कंपन्यांची सेंसेक्समध्ये एंट्री होणार आहे तर CONCOR, Tata Elxsi या कंपन्या बाहेर जाणार आहेत.

