Sukanya Samriddhi Yojana: फक्त 411 रुपये गुंतवा... सरकारी योजनेत मिळतील 72 लाख; समजून घ्या संपूर्ण गणित

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजना ही मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठीची सर्वात सुरक्षित सरकारी योजना आहे. या योजनेत 15 वर्षे शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत ₹72 लाखांचा निधी तयार होऊ शकतो.
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi YojanaPudhari
Published on
Updated on

Sukanya Samriddhi Yojana: भारतासारख्या देशात मुलीच्या जन्मापासूनच तिचे पालक तिच्या भविष्याची चिंता करू लागतात. तिच्या शिक्षणासाठी, चांगल्या करिअरसाठी, आणि योग्य वेळी तिच्या लग्नाच्या खर्चासाठी पैसा लागणार हे त्यांना माहीत असते. त्यामुळे लोक सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणूक शोधत असतात. हीच गरज ओळखून केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सरु केली आहे.

या योजनेचे पैसे सुरक्षित राहतात. बाजार खाली आला, अर्थव्यवस्था मंदावली, जगांत काहीही घडलं, तरी तुमच्या गुंतवणुकीचा एक रुपयादेखील बुडण्याचा धोका नाही. ही सरकारी हमी आहे. विशेष म्हणजे आज देशात जवळपास चार कोटींहून अधिक सुकन्या खाते उघडले गेले आहेत.

सुकन्या समृद्धी योजनेत आपण केलेली गुंतवणूक केवळ सुरक्षित नसते, तर त्यावर चक्रवाढ व्याजामुळे रक्कम झपाट्याने वाढते. या योजनेत फक्त 15 वर्षे पैसे भरायचे असतात आणि खाते 21 वर्षांनी मॅच्युर होते. म्हणजेच, शेवटच्या 6 वर्षांत तुम्ही गुंतवणूक थांबवता, तरी तुमचे पैसे सतत वाढत राहतात.

Sukanya Samriddhi Yojana
Long Term Investment: तुम्ही SIP थांबवली? या फंडने 1,000 रुपयांचे केले 1.13 कोटी; तुमचाही विश्वास बसणार नाही

या योजनेवर सरकारने 8.2 टक्के व्याजदर लागू केला आहे, जो देशातील बर्‍याच योजनांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. जर आई-वडिलांनी आपल्या मुलीसाठी वर्षाला 1.50 लाख रुपये गुंतवले, तर 15 वर्षांत एकूण 22 लाख 50 हजार रुपये जमा होतात. पण मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत या रकमेवर मिळणारे व्याज मिळून एकूण रक्कम सुमारे 72 लाख रुपयांपर्यंत पोहोचते. म्हणजेच गुंतवलेली रक्कम जवळपास तीन पट वाढते.

Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi YojanaPudhari

या योजनेत करसवलतही मिळते. कारण ही योजना EEE श्रेणीत येते. गुंतवणुकीवर कर लागू होत नाही, त्यावर मिळणाऱ्या व्याजावरही कर नसतो आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी रक्कमदेखील करमुक्त असते. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीवर कुठेही कराचा बोजा पडत नाही. पण ही करसवलत मिळण्यासाठी जुनी करप्रणाली निवडलेली असावी, हे मात्र लक्षात ठेवावे.

Sukanya Samriddhi Yojana
Nitish Kumar Net Worth: 'एक फ्लॅट, गायी आणि वासरं...' मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे किती संपत्ती? आकडा वाचून थक्क व्हाल

या योजनेच्या अटी देखील अतिशय सोप्या आहेत. मुलगी जास्तीत जास्त 10 वर्षांची असताना खाते उघडता येते. पालकांनी प्रत्येक वर्षी मोठी रक्कमच टाकायला हवी, असा काही नियम नाही. इच्छेनुसार आणि परिस्थितीनुसार तुम्ही 250 रुपयांपासून सुरुवात करू शकता आणि गुंतवणूक वाढवतही जाऊ शकता. पैशाची अडचण आली तर एखाद्या वर्षी कमी रक्कम टाकली तरी खाते बंद होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news