Stock Market Today: जागतिक तणावाचा परिणाम; शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: काल झालेल्या तेजीनंतर आज शेअर बाजारात सुस्त सुरुवात झाली आहे. निफ्टी 24,200 च्या वर टिकून असताना मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये तेजी दिसली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: काल झालेल्या जोरदार तेजीनंतर बुधवारी शेअर बाजाराने सावध सुरुवात केली. जागतिक घडामोडी आणि मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आज चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल-हिरव्या रंगात फिरत होते. निफ्टीने मात्र 24,200 च्या वरचा स्तर टिकवून ठेवला, त्यामुळे बाजारात स्थैर्य असल्याचे संकेत मिळाले.

सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स मोठ्या चढ-उतारांसह 78,200 च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे 12 अंकांनी घसरून 24,253 वर व्यवहार करताना दिसला. दुसरीकडे, बँक निफ्टीमध्येही घसरण दिसून आली आणि तो सुमारे 200 अंकांनी घसरून 56,780 च्या आसपास व्यवहार करत होता. बाजारातील काही क्षेत्रांमध्ये सकारात्मक हालचाल दिसून आली. विशेषतः मेटल आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी वाढल्याने या क्षेत्रांमध्ये तेजी पाहायला मिळाली.

जागतिक बाजारांचा परिणाम

आज बाजारावर जागतिक घडामोडींचा मोठा प्रभाव दिसून आला. मध्यपूर्वेत वाढत असलेला तणाव आणि स्ट्रेट ऑफ होर्मुज या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून होणाऱ्या तेलवाहतुकीबाबत अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण वक्तव्यांमुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.

अमेरिकन शेअर बाजारातही मंगळवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. जवळपास 800 अंकांच्या रेंजमध्ये व्यवहार झाल्यानंतर डाओ जोन्स किंचित घसरणीसह बंद झाला, तर तंत्रज्ञान क्षेत्रातील नॅस्डॅक निर्देशांकही दिवसाच्या उच्चांकावरून घसरत जवळपास सपाट पातळीवर बंद झाला.

आशियाई बाजारातून सकारात्मक संकेत

दरम्यान, आशियाई बाजारांकडून तुलनेने सकारात्मक संकेत मिळाले. दक्षिण कोरिया आणि जपानचे बाजार 2 ते 2.5 टक्क्यांनी वाढले. मात्र GIFT निफ्टी सुमारे 100 अंकांनी घसरून 24,300 च्या आसपास व्यवहार करत होता.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठे चढउतार

मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी अस्थिरता दिसून आली. अमेरिकेच्या ऊर्जा मंत्र्यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील तेल टँकर्सना सुरक्षा देण्याबाबत केलेल्या वक्तव्यांनंतर आणि त्यानंतर व्हाइट हाउसने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे तेल बाजारात मोठे चढ-उतार झाले.

इंट्राडे व्यवहारात ब्रेंट क्रूड 82 डॉलरच्या खाली घसरले, पण नंतर काही प्रमाणात सुधारणा दिसली. एकूणच तेलाच्या किमतींमध्ये जवळपास 11 टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. पुढील काळातही मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे तेलाच्या किमतीत अस्थिरता राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Stock Market Today
Petrol Diesel Stock: भारतात खरचं पेट्रोल-डिझेलची टंचाई? सरकारने केला मोठा खुलासा

अमेरिकेची इराणला चेतावणी

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात ठेवण्यात आलेल्या दहा निष्क्रिय माईन्स नष्ट केल्याचा दावा केला आहे. त्यांनी इराणला इशारा देत म्हटले की, जर या माईन्स हटवल्या नाहीत तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

त्याचवेळी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनीही इराणवर मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली आहे. इस्रायलनेही इराणवर हल्ले तीव्र केल्याने संपूर्ण प्रदेशात तणाव वाढला आहे.

Stock Market Today
Gas Shortage: गॅस टंचाई झाली तर सर्वात आधी कोणाला सिलेंडर मिळणार? सरकारने बनवली नियमावली

रिलायन्सची मोठी गुंतवणूक

या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्रातूनही एक मोठी बातमी समोर आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत 300 अब्ज डॉलरच्या मोठ्या भागीदारीची घोषणा केली आहे. या करारानुसार रिलायन्स अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एक मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार आहे. ही योजना प्रत्यक्षात आली तर अमेरिकेच्या ऊर्जा क्षेत्रात भारतीय कंपन्यांची ही सर्वात मोठी गुंतवणूक ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news