Stock Market Today: शेअर बाजार उघडताच तेजीचा धमाका, पण काही मिनिटांतच निफ्टी 25 हजारांच्या खाली; नेमकं काय घडलं?

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार सुरुवात केली. मात्र, नफावसुलीमुळे निफ्टी 25 हजारांच्या खाली घसरला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली. मात्र, बाजार उघडल्यानंतर काही वेळातच गुंतवणूकदारांनी नफावसुलीला सुरुवात केली. त्यामुळे निफ्टी 25 हजारांच्या खाली घसरला. आयटी, एफएमसीजी, मेटल आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. दुसरीकडे, फार्मा, मीडिया आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी कायम होती.

शेअर बाजारातील महत्त्वाचे अपडेट्स

दमदार सुरुवातीनंतर बाजारात घसरण

  • सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी निफ्टी 90 अंकांच्या वाढीसह 25,076 वर उघडला.

  • सेन्सेक्समध्येही 327 अंकांची वाढ झाली. तो 81,327 वर उघडला.

  • मात्र, सुरुवातीची तेजी फार काळ टिकली नाही.

  • गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरू केल्याने निफ्टी 50 अंकांहून अधिक घसरून 25 हजारांच्या खाली आला.

  • रविवारी झालेल्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये निफ्टी 44 अंकांनी घसरून 24,986 वर बंद झाला होता.

आयटी, ऑटो आणि मेटल शेअर्समध्ये विक्री

  • मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये सुमारे 0.20 टक्क्यांची घसरण झाली.

  • आयटी, एफएमसीजी, मेटल आणि ऑटो क्षेत्रातील निर्देशांक जवळपास 0.9 टक्क्यांपर्यंत घसरले.

  • दुसरीकडे, फार्मा, मीडिया आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

जागतिक बाजारातून संमिश्र संकेत

  • शुक्रवारी अमेरिकेतील डाऊ जोन्स 264 अंकांनी वधारला.

  • मात्र, नॅस्डॅक 237 अंकांनी घसरला.

  • आशियाई बाजारात जपानच्या निक्केई निर्देशांकात 3.3 टक्के, तर दक्षिण कोरियाच्या कोस्पीमध्ये 1.2 टक्क्यांची वाढ झाली.

Stock Market Today
Western Railway Local Train Update: फटाक्यांमुळे मुंबईकरांचे हाल! पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल ३० मिनिटे उशिराने, काय घडलं?

FIIs कडून भारतीय बाजारात मोठी खरेदी

  • परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सहा दिवसांत रोख बाजारात सुमारे 50 हजार कोटी रुपयांची खरेदी केली.

  • दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) याच काळात जवळपास 25 हजार कोटी रुपयांची विक्री केली.

  • एचएसबीसीने भारताचे रेटिंग 'न्यूट्रल'वरून 'ओव्हरवेट' केले आहे. तर चीनचे रेटिंग कमी करून 'न्यूट्रल' केले आहे.

इराण-अमेरिका युद्धाचा धोका कमी?

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चेदरम्यान हल्ला करण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले.

  • होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली झाल्यास युद्धाचा धोका खूपच कमी होऊ शकतो, असे संकेत देण्यात आले आहेत.

Stock Market Today
Gold Silver Price Today: दिवाळीनंतर सोन्याचे दर धडाम! चांदीही झाली स्वस्त; पाहा आजचे २४ आणि २२ कॅरेटचे दर

निफ्टीसाठी 24,750 महत्त्वाची पातळी

  • एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, बाजारातील मोठ्या तेजीमुळे काही काळ स्थिरता येऊ शकते.

  • निफ्टीचा RSI 78 च्या पुढे गेला असून बाजारात सध्या जास्त खरेदी झाल्याचे संकेत मिळत आहेत.

  • त्यामुळे आगामी काही सत्रांमध्ये बाजारात काहीशी घसरण किंवा स्थिरता दिसू शकते.

  • निफ्टीसाठी 24,800 ते 24,750 हा महत्त्वाचा आधार आहे.

  • निफ्टी 24,750 च्या वर टिकून राहिल्यास बाजारातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त मंगळवारी शेअर बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे आजच्या व्यवहारातील घडामोडींवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.