Gold Silver Price Today: दिवाळीनंतर सोन्याचे दर धडाम! चांदीही झाली स्वस्त; पाहा आजचे २४ आणि २२ कॅरेटचे दर

Gold Silver Price Today: दिवाळीनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी देशात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Gold Silver Price Today: दिवाळीचा सण संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ९ नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर खाली आले आहेत. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, पुणे, कोलकाता आणि चेन्नईमध्येही सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ५९० रुपये होता. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ७४० रुपये इतका होता. मुंबई आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४३ हजार ५६० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ५९० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला.

पुणे आणि बंगळुरूमध्येही सोन्याचे दर मुंबईप्रमाणेच आहेत. या दोन्ही शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४३ हजार ५६० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३१ हजार ५९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४३ हजार ३४० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ३९० रुपये आहे.

मात्र, सध्याच्या घसरणीकडे पाहून सोन्याचे दर सातत्याने कमी होत असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत तब्बल ४ हजार ६९० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सध्याच्या दरातील घसरण ही ग्राहकांसाठी काहीशी दिलासादायक असली, तरी बाजारातील चढ-उतार कायम आहेत.

Gold Silver Price Today
Rs 5 Snack Packets: स्नॅक्स कंपन्यांसमोर मोठं संकट; ५ रुपयांचा चिप्सचा पुडा होणार इतिहासजमा? समोर आलं धक्कादायक कारण

धनत्रयोदशीला सोन्याच्या विक्रीत मोठी वाढ

यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचा अंदाज आहे. या दिवशी सोन्याचा एकूण व्यापार सुमारे ६० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. जागतिक बाजारात सोन्याचा स्पॉट भाव ४,०६५.६३ डॉलर प्रति औंस इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा परिणाम देशांतर्गत सोन्याच्या दरांवरही होत असतो.

Gold Silver Price Today
Western Railway Local Train Update: फटाक्यांमुळे मुंबईकरांचे हाल! पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल ३० मिनिटे उशिराने, काय घडलं?

चांदीच्या दरातही घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही ९ नोव्हेंबर रोजी घसरण झाली आहे. सोमवारी सकाळी चांदीचा दर प्रति किलो २ लाख ४ हजार ९०० रुपये होता. मात्र, गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत ५ हजार रुपयांची वाढ झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव ५२.१८ डॉलर प्रति औंस इतका आहे. त्यामुळे आता आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि मागणी यांचा सोन्या-चांदीच्या किमतींवर काय परिणाम होतो, याकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

नोंद: प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी शहर, ज्वेलर्स, जीएसटी आणि घडणावळीनुसार अंतिम किंमत बदलू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.