Stock Market Today: मंथली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांचे 40 हजार कोटींचे नुकसान

Stock Market Today: मंथलीएक्सपायरीच्या दिवशी निफ्टी 24 अंकांनी आणि सेन्सेक्स घसरणीसह उघडल्याने गुंतवणूकदारांचे सुमारे 40 हजार कोटींचे नुकसान झाले.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: मंथली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 24 अंकांनी घसरून 23,971 वर, तर सेन्सेक्स 4 अंकांनी घसरून 76,831 वर उघडला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.

बीएसईवर लिस्डेट कंपन्यांच्या बाजारमूल्यात सुमारे 40 हजार कोटींची घट झाली असून, एकूण मार्केट कॅप 480.40 लाख कोटींवर आले आहे. याआधी सोमवारी सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. त्या दिवशी निफ्टी 228 अंकांनी वाढून 23,995 वर बंद झाला होता.

आशियाई बाजारातही मोठी घसरण

भारतीय बाजारासोबतच आशियातील अनेक शेअर बाजारांमध्येही मोठी घसरण झाली आहे. विशेषतः चिप (सेमिकंडक्टर) कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री वाढल्याने दक्षिण कोरियाचा KOSPI निर्देशांक सुमारे 9% घसरला. घसरण इतकी मोठी होती की काही काळासाठी व्यवहारही थांबवावे लागले.

जपानचा निक्केई निर्देशांकही 4.5% पेक्षा जास्त घसरला. अमेरिकेतील NVIDIA या चिप कंपनीच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम आशियाई बाजारांवर दिसून आला.

अमेरिकेच्या फेडच्या बैठकीकडे बाजाराचे लक्ष

आजपासून अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची महत्त्वाची बैठक सुरू होत आहे. व्याजदरांबाबतचा निर्णय बुधवारी रात्री जाहीर होणार असून, त्याचा परिणाम गुरुवारी भारतीय शेअर बाजारावर दिसू शकतो. महागाई आणि व्याजदरांबाबत फेड काय निर्णय घेते, याकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Stock Market Today
Mohammad Irfan: शाळेत गेला नाही पण संविधान तोंडपाठ; CJPच्या आंदोलनात व्हायरल झालेला इरफान कोण? राहुल गांधींनी घेतली भेट

बाजारावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक

  • अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता.

  • चर्चेच्या आशेने कच्च्या तेलाच्या किंमती 87 डॉलरच्या आसपास आल्या आहेत.

  • परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) ₹1,688 कोटींची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DII) ₹2,329 कोटींची खरेदी केली.

  • या आठवड्यात Amazon, Meta, Microsoft आणि Apple या मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार असून, त्याचा जागतिक बाजारावर परिणाम होऊ शकतो.

Stock Market Today
E20 Fuel Protest : 'E20 इंधन बंद करा!'; ४ ऑगस्टला वाहतूक संघटनांचा संसदेवर धडक मोर्चा

अमेरिका-इराण चर्चेमुळे दिलासा

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव काहीसा कमी होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चेची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली असून, सध्या ते 87 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत आहे.

गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेच्या फेडच्या निर्णयाकडे आणि जागतिक घडामोडींवर केंद्रित झाले असून, त्यानुसार पुढील काही दिवस शेअर बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

logo
Pudhari News
pudhari.news