Stock Market Today: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 24 हजारांच्या वर, पण गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली

Stock Market Today: जून महिन्याच्या आणि जून सिरीजच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी निफ्टी ८५ अंकांच्या वाढीसह २४,०३२ वर उघडला, मात्र काही मिनिटांतच घसरून २३,९०० च्या खाली आला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: जून महिन्याच्या तसेच जून सिरीजच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. मंगळवारी व्यवहार सुरू होताच निफ्टी ८५ अंकांनी वधारून २४,०३२ वर उघडला, तर सेन्सेक्स २७७ अंकांच्या वाढीसह ७७,००५ वर पोहोचला. मात्र, ही तेजी फार काळ टिकली नाही. सुरुवातीच्या काही मिनिटांतच विक्रीचा दबाव वाढल्याने निफ्टी जवळपास ७० अंकांनी घसरून २३,९०० च्या खाली आला. सोमवारी बाजारातही दबाव दिसून आला होता. निफ्टी १०९ अंकांच्या घसरणीसह २३,९४६ वर बंद झाला होता.

कोणत्या क्षेत्रांवर दबाव?

आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. या क्षेत्रांचे निर्देशांक सुमारे दीड टक्क्यांपर्यंत खाली आले. दुसरीकडे फार्मा, हेल्थकेअर आणि केमिकल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा कल दिसून आला.

हे शेअर्स तेजीत, तर हे घसरले

सुरुवातीच्या व्यवहारात मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक आणि सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अर्धा ते एक टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

तर आयशर मोटर्स, टाटा कन्झ्युमर, TCS, इन्फोसिस आणि डॉ. रेड्डीज यांच्या शेअर्समध्ये २ ते ६ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली.

एक्सपायरी दिवशी निफ्टी का असतो दबावाखाली?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीवर विक्रीचा दबाव राहण्याची शक्यता अधिक असते. मागील चार एक्सपायरी सत्रांमध्ये निफ्टी घसरला होता. गेल्या दहा एक्सपायरींपैकी नऊ वेळा निफ्टीने नकारात्मक कामगिरी केली आहे. केवळ जानेवारी महिन्यात निफ्टी १२७ अंकांनी वाढला होता. यामुळे अनेक विश्लेषक मजबूत सुरुवात झाल्यास उच्च पातळीवर नफा वसूल करण्याचा सल्ला देत आहेत.

बँक निफ्टीची स्थिती तुलनेने स्थिर

बँक निफ्टीमध्येही मागील काही एक्सपायरींमध्ये घसरण झाली असली, तरी निफ्टीच्या तुलनेत त्यातील घसरण कमी राहिली आहे. गेल्या दहा एक्सपायरींपैकी सहा वेळाच बँक निफ्टी घसरला आहे.

जागतिक घडामोडींवर बाजाराचे लक्ष

आज कतारची राजधानी दोहा येथे अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा चर्चा होणार आहे. त्यामुळे जागतिक बाजाराचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. कच्च्या तेलाचा भाव सध्या प्रति बॅरल ७२ ते ७३ डॉलर दरम्यान आहे. परदेशी गुंतवणूकदारांची विक्रीही काहीशी कमी झाली असून त्यामुळे बाजारातील भावना स्थिर राहण्यास मदत होत आहे.

Stock Market Today
Monsoon Alert: मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार! ठाणे, रायगड, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

बाजारावर परिणाम करणारे प्रमुख घटक

  • अमेरिकेचा डाओ जोन्स निर्देशांक प्रथमच ५२,००० च्या वर गेला.

  • जपानचा निक्केई निर्देशांक सुमारे ०.९% वाढला.

  • दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ०.७% मजबूत झाला.

  • कच्च्या तेलाचा भाव ७२.५ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे.

  • सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) १,३५० कोटी रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) २,८०१ कोटी रुपयांची खरेदी केली.

तज्ज्ञांचे मत काय?

जियोजीत इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, अमेरिका-इराण तणाव आणि त्यावरील चर्चांमुळे बाजारात अजूनही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे वरच्या स्तरावर गुंतवणूकदार नफा वसूल करत आहेत.

याशिवाय जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी, महागाई, मान्सून आणि अमेरिकेची व्याजदरासंदर्भातील भूमिका यावर आगामी काळात बाजाराची दिशा अवलंबून राहील. तसेच अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरावरील निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news