Stock Market Today: शेअर बाजाराची संथ सुरुवात! निफ्टी 24,061 वर, सेन्सेक्स घसरला; गुंतवणूकदारांची नजर महत्त्वाच्या घडामोडींवर

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्या व्यवहारात भारतीय शेअर बाजाराने संमिश्र सुरुवात केली असून निफ्टी 24,061 वर तर सेन्सेक्स 77,055 वर उघडला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच व्यवहारात भारतीय शेअर बाजाराने संथ सुरुवात केली. सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी बाजार उघडताच निफ्टी 5 अंकांच्या किरकोळ वाढीसह 24,061 वर, तर सेन्सेक्स 45 अंकांच्या घसरणीसह 77,055 वर व्यवहार करताना दिसला. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आशियाई बाजारांमध्येही संमिश्र वातावरण होते. जपानचा निक्केई निर्देशांक सुमारे अर्धा टक्का घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी जवळपास 1.75 टक्क्यांनी खाली आला. दुसरीकडे, हाँगकाँगच्या हँगसेंग निर्देशांकात सुमारे 1.75 टक्क्यांची वाढ झाली.

कोणत्या क्षेत्रात तेजी, कोणत्या क्षेत्रात मंदी?

आजच्या व्यवहारात क्षेत्रनिहाय संमिश्र चित्र दिसून आले. फायनान्शियल, मेटल, फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा कल दिसत आहे. मात्र ऑटो, आयटी, पीएसयू बँका आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव कायम आहे.

निफ्टी-50 मधील डॉ. रेड्डीज, ट्रेंट, श्रीराम फायनान्स आणि ONGC हे शेअर्स आघाडीवर असून त्यामध्ये सुमारे 3.75 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे कोटक महिंद्रा बँक, अदानी एंटरप्रायझेस आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये अडीच टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

गेल्या आठवड्यात बाजाराची कामगिरी कशी होती?

मागील आठवड्यात निफ्टीने 43 अंकांची वाढ नोंदवत 24,056 या पातळीवर आठवड्याचा शेवट केला होता. मात्र मिडकॅप निर्देशांकात 0.8 टक्के, तर स्मॉलकॅपमध्ये 0.2 टक्क्यांची घसरण झाली होती. दरम्यान, आशियातील इतर बाजारांमध्ये मोठी अस्थिरता दिसली. हाँगसेंग 5 टक्क्यांनी, तैवान 4 टक्क्यांनी आणि कोस्पी 7 टक्क्यांनी घसरला होता.

बाजारावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल 72 डॉलरच्या आसपास आहे, जो युद्धापूर्वीच्या पातळीवर परतला आहे. त्यामुळे महागाई आणि ऊर्जा खर्चाबाबत काहीसा दिलासा मिळत आहे.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) मागील सत्रात 384 कोटी रुपयांची खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 5,747 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली. यामुळे बाजाराला आधार मिळाल्याचे मानले जात आहे.

याशिवाय अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होण्याच्या घडामोडींमुळे जागतिक बाजारातील भीती काही प्रमाणात कमी झाली असून त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.

Stock Market Today
Persistent Nagarro Acquisition: पुण्याच्या कंपनीचा जगभरात डंका! 11 हजार कोटींची मेगा डील; जर्मनीची IT कंपनी घेणार ताब्यात

निफ्टीसाठी महत्त्वाची पातळी कोणती?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी यांच्या मते, निफ्टीला 24,200 ही प्रतिकार (Resistance) पातळी पार करण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे भविष्यात बाजार एका मर्यादित पट्ट्यात (Range-bound) राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, बाजारात घसरण झाल्यास 23,800 ही निफ्टीसाठी महत्त्वाची आधार (Support) पातळी ठरेल.

गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवावे?

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, येत्या काही दिवसांत अमेरिकेतील महागाईचा डेटा, PMI निर्देशांक, पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल, कच्च्या तेलाच्या किमती, मान्सूनची प्रगती आणि भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतचे संकेत हे घटक बाजाराची पुढील दिशा ठरवतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news