Stock Market Today: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! शेअर बाजारात पुन्हा तेजी, निफ्टी 23,350 च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Stock Market Today: मंगळवारच्या घसरणीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली असून निफ्टी 23,350 च्या वर टिकून आहे.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने बुधवारी सकाळी सकारात्मक सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी 23 अंकांच्या वाढीसह 23,352 अंकांवर, तर सेन्सेक्स 119 अंकांच्या वाढीसह 74,648 अंकांवर उघडला. बाजारात मोठी तेजी किंवा घसरण दिसत नसली, तरी निफ्टी 23,350 च्या वर टिकून राहिला आहे.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही रिकव्हरी

ब्रॉडर मार्केटमध्येही आज चांगली रिकव्हरी पाहायला मिळत आहे. मिडकॅप इंडेक्समध्ये सुमारे 0.25 टक्क्यांची, तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये जवळपास 0.50 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सेक्टोरल इंडेक्समध्ये आयटी क्षेत्र वगळता बहुतांश निर्देशांक हिरव्या रंगात आहेत. मेटल इंडेक्समध्ये सर्वाधिक तेजी असून तो जवळपास 1 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. याशिवाय एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्येही खरेदीचा कल दिसत आहे.

सेन्सेक्समधील 23 शेअर्स तेजीत

सेन्सेक्समधील 30 पैकी 23 शेअर्स आज सकाळच्या व्यवहारात वाढीसह, तर 7 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील आणि एशियन पेंट्स यांसारख्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसत आहे. दुसरीकडे, टीसीएस, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर दबाव आहे.

मंगळवारी चार दिवसांच्या तेजीला ब्रेक

शेअर बाजारात सलग चार दिवस सुरू असलेल्या तेजीला मंगळवारी ब्रेक लागला. निफ्टी 85 अंकांनी घसरून 23,329 अंकांवर बंद झाला होता. त्यामुळे अल्पावधीत बाजारावर दबाव कायम राहण्याची शक्यता बाजार विश्लेषक व्यक्त करत आहेत.

मात्र, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि सणासुदीच्या हंगामाची सुरुवात यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा मूड सुधारण्यास मदत होऊ शकते.

Stock Market Today
Azamgarh Massacre: महामृत्युंजय जप सुरू होता, अचानक पिस्तूल निघालं; पत्नी, दोन पंडित अन् मुलाची हत्या, आजमगड हत्याकांडाची इनसाइड स्टोरी

अमेरिका-इराण चर्चेकडे बाजाराचे लक्ष

अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेचाही जागतिक बाजारांवर परिणाम होत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांची इराणी प्रतिनिधींसोबत सुमारे तीन तास चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही चर्चा चांगली झाल्याचे म्हटले आहे. भविष्यात अमेरिका आणि इराणमध्ये करार झाल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

इराणच्या तेल निर्यातीवरील निर्बंध हटवल्यास हॉर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतही चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नोव्हेंबरमधील अमेरिकन मिड-टर्म निवडणुकांपूर्वी प्रत्यक्ष करार होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. इराणकडून या चर्चेबाबत प्रतिक्रिया आलेली नाही.

ग्लोबल मार्केटमध्ये ‘Risk On’ वातावरण

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर जागतिक बाजारांमध्ये पुन्हा जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढल्याचे दिसत आहे. एआय शेअर्समध्ये पुन्हा खरेदी वाढली आहे. क्रिप्टोसारख्या जोखमीच्या मालमत्तांमध्येही तेजी दिसत आहे.

सोने आणि चांदीच्या किमतीतील घसरणीलाही काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. डॉलर इंडेक्स 100 च्या वर आहे. दुसरीकडे, कॉपरच्या किमती पुन्हा विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उदयोन्मुख बाजारपेठांमध्येही तेजीचा कल परतण्याची शक्यता आहे.

Stock Market Today
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट निवडणुकीच्या मैदानात उतरणार? असीम सरोदे यांच्या पोस्टने राजकीय चर्चेला उधाण

निफ्टीसाठी 23,200 महत्त्वाचा सपोर्ट

SAMCO Securitiesचे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट ओम मेहरा यांच्या मते, चार दिवसांच्या तेजीला मंगळवारी ब्रेक लागला आणि निफ्टी 23,329 वर बंद झाला.

निफ्टीचा RSI सध्या 35 च्या आसपास असून तो बाजारातील न्यूट्रल मोमेंटमचे संकेत देत आहे. निफ्टीसाठी 23,200 हा महत्त्वाचा सपोर्ट, तर त्याखाली 23,100 हा पुढील सपोर्ट आहे. बाजारात रिकव्हरी झाल्यास 23,500 ही महत्त्वाची रेसिस्टन्स पातळी ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news