Stock Market Today: जुलै सिरीजची सकारात्मक सुरुवात; निफ्टी 23,900 च्या पुढे, गुंतवणूकदारांना मोठा दिलासा

Stock Market Today: जुलै मालिकेच्या पहिल्या व्यवहारात भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात करत निफ्टीने 23,900 चा टप्पा पार केला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: जुलै महिन्यातील पहिल्याच सत्राची सुरुवात सकारात्मक झाली. निफ्टी 32 अंकांच्या वाढीसह 23,897 वर, तर सेन्सेक्स 66 अंकांनी वधारून 76,545 वर उघडला. मंगळवारी निफ्टी 80 अंकांनी घसरून 23,865 वर बंद झाला होता. सकाळच्या व्यवहारात ऑटो, FMCG, मीडिया आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. मात्र बँकिंग, फायनान्स सेवा आणि मेटल क्षेत्रावर काहीसा दबाव कायम आहे.

कोणते शेअर्स तेजीत, कोणते घसरले?

निफ्टीमध्ये Eternal, Nestle India, Titan आणि Mahindra & Mahindra या शेअर्समध्ये सुमारे 2.5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. दुसरीकडे Bajaj Finserv, Hindalco आणि HDFC Life या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

जुलै मालिका साधारणपणे सकारात्मकच

इतिहास पाहिला तर जुलै महिना शेअर बाजारासाठी तुलनेने चांगला ठरला आहे. गेल्या 10 वर्षांपैकी 7 वेळा जुलै मालिकेत निफ्टीने सकारात्मक परतावा दिला, तर बँक निफ्टी 6 वेळा वाढीसह बंद झाला. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना यंदाही बाजाराकडून सकारात्मक अपेक्षा आहेत.

परदेशी गुंतवणूकदारांची विक्री कायम

मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) 2,556 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. मात्र याच दिवशी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 6,842 कोटी रुपयांची मोठी खरेदी केली. त्यामुळे बाजाराला काहीसा आधार मिळाला.

आशियाई आणि अमेरिकन बाजारांचा प्रभाव

आशियाई बाजारांमध्ये संमिश्र चित्र दिसत आहे. जपानचा निक्केई निर्देशांक अर्ध्या टक्क्याने वधारला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी 3 टक्क्यांहून अधिक घसरला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांकही घसरणीसह व्यवहार करत आहे. अमेरिकन बाजारात मात्र सकारात्मक वातावरण होते. डाओ जोन्समध्ये 136 अंकांची वाढ, तर नॅस्डॅकमध्ये जवळपास दीड टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली.

Stock Market Today
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; 1 जुलैपासून पेट्रोल 5 रुपये, तर डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त

बाजारावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 73 डॉलरच्या आसपास स्थिर आहे. दुसरीकडे डॉलर निर्देशांक 101 च्या जवळ असून डॉलर मजबूत होत आहे. रुपयातही सलग तिसऱ्या दिवशी घसरण दिसून आली आहे.

आज बाजारासाठी महत्त्वाचे घटक

अमेरिकन बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, देशांतर्गत गुंतवणूकदारांची मोठी खरेदी, जुलै मालिकेचा ऐतिहासिक सकारात्मक कल आणि कच्च्या तेलाच्या स्थिर किमती या गोष्टी बाजारासाठी सकारात्मक मानल्या जात आहेत.

मात्र परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, त्यांच्या फ्युचर्समधील कमी लॉन्ग पोझिशन, रुपयातील घसरण आणि निफ्टी महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलजवळ असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

निफ्टीसाठी महत्त्वाचे स्तर कोणते?

SAMCO Securities चे रिसर्च अॅनालिस्ट धूपेश धामीजा यांच्या मते, सध्या निफ्टी 23,865 ते 24,130 या महत्त्वाच्या तांत्रिक पट्ट्यात व्यवहार करत आहे.

त्यांच्या मते, 23,850 ते 23,900 या स्तरावर खरेदीदार सक्रिय होताना दिसत आहेत. मात्र निफ्टी या पातळीखाली गेल्यास विक्रीचा दबाव वाढू शकतो. दुसरीकडे 24,150 ते 24,200 चा स्तर पार केल्यानंतरच बाजारात नव्याने मोठी खरेदी आणि तेजी दिसण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news