Stock Market Today: शेअर बाजारात हलकी तेजी; जागतिक तणावामुळे बाजार सावध, बँकिंग शेअर्स घसरले

Stock Market Today: मिडल ईस्टमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारावर दबाव असून भारतीय शेअर बाजाराची सुरुवात हलक्या तेजीसह झाली. निफ्टी 23,100 च्या वर व्यवहार करत असताना बँक निफ्टीमध्ये घसरण दिसून आली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने आजच्या व्यवहाराची सुरुवात तेजीसह केली. सकाळच्या सत्रात Nifty 50 निर्देशांक 23,100 च्या वर व्यवहार करताना दिसला, तर बँकिंग क्षेत्रातील दबावामुळे Nifty Bank निर्देशांक तुलनेने कमकुवत होता. जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचा परिणाम जागतिक बाजारावर स्पष्टपणे दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील खार्ग आयलंड येथील तेल निर्यात केंद्रावर हल्ले वाढवण्याची धमकी दिल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीतील काही अमेरिकन ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे.

या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली असून दर 103 डॉलरच्या वर आहेत. जागतिक पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती असल्याने ऊर्जा बाजारात अनिश्चितता वाढली आहे. इराणने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुज सामुद्रधुनी मित्र राष्ट्रांसाठी खुली राहील, मात्र शत्रू देशांसाठी ती बंद केली जाऊ शकते.

दरम्यान, भारतासाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे एलपीजीने भरलेली भारताची दोन जहाजे सुरक्षितपणे होर्मुज सामुद्रधुनी पार करून गुजरातकडे रवाना झाली आहेत. मात्र अजूनही भारताची सुमारे 22 जहाजे त्या परिसरात असल्याने पुरवठ्याबाबत चिंता कायम आहे.

या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारातील मिश्र संकेत दिसत आहेत. GIFT Nifty सुमारे 150 अंकांनी वाढून 23,350 च्या आसपास व्यवहार करत आहे. तसेच अमेरिकेच्या बाजारातील Dow Jones Industrial Average फ्युचर्समध्येही सुमारे 170 अंकांची तेजी दिसून आली आहे.

मात्र प्रत्यक्ष अमेरिकन बाजारांमध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण नोंदवली गेली. डाऊ जोन्स निर्देशांक घसरणीसह बंद झाला. तसेच Nasdaq Composite निर्देशांकही मोठ्या चढउतारांनंतर घसरणीसह बंद झाला. त्यामुळे अमेरिकन बाजार सुमारे साडेतीन महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचले.

डॉलरमध्ये मजबुती कायम असून US Dollar Index 100 च्या वर बंद झाला आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या 10 वर्षांच्या बाँड यिल्डमध्येही वाढ होत सुमारे 4.25 टक्क्यांच्या वर पोहोचली आहे, जी सात आठवड्यांतील उच्चांक मानली जात आहे.

भारतीय बाजारात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा दबाव कायम आहे. एफआयआयने सलग अकराव्या दिवशी विक्री करत कॅश मार्केटमध्ये सुमारे 10,716 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. एकूणच त्यांच्या विक्रीचा आकडा सुमारे 16,875 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र याउलट देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सलग तेराव्या दिवशी खरेदी करत जवळपास 9,977 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

Stock Market Today
Airline Ticket Prices: विमान प्रवास महागणार! इंडिगोने आजपासून तिकिटांवर फ्युएल चार्ज केला लागू; दर किती वाढणार?

दरम्यान डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम मौल्यवान धातूंवरही दिसून आला. चांदीच्या किमतींमध्ये सुमारे 8,500 रुपयांची मोठी घसरण झाली, तर सोन्याच्या दरातही सुमारे 1,800 रुपयांची घट झाली.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम विमान कंपन्यांवरही होत आहे. Air India नंतर आता IndiGo आणि Akasa Air यांनीही तिकिटांवर फ्यूल सरचार्ज वाढवला आहे. इंडिगोने देशांतर्गत उड्डाणांवर 425 रुपयांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 2,300 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क लावले आहे.

Stock Market Today
Shivam Dube Flats Mumbai: शिवम दुबेची मोठी गुंतवणूक! मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट; किंमत वाचून थक्क व्हाल

दरम्यान बाजार नियामक Securities and Exchange Board of India (SEBI) यांनी म्युच्युअल फंडांना तरलतेशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी काही अटींसह इंट्राडे कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे. हा नवा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.

अमेरिकेसोबत व्यापार करार थांबला असल्याच्या बातम्यांचे सरकारने खंडन केले आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या मते भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार सकारात्मक दिशेने पुढे जात आहे.

एकूणच मध्यपूर्वेतील तणाव, कच्च्या तेलातील वाढ, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यामुळे आजच्या सत्रात भारतीय बाजाराची दिशा मोठ्या प्रमाणावर जागतिक घडामोडींवर अवलंबून राहणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news