Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी 60 अंकांनी घसरला, टायटनमध्ये जोरदार तेजी

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स सुमारे 180 अंकांनी घसरला, तर निफ्टीतही 60 अंकांची घसरण दिसून आली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स सुमारे 180 अंकांनी घसरला, तर निफ्टीतही 60 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टीवर विशेष दबाव होता आणि तो जवळपास 151 अंकांनी घसरून 59,967 च्या आसपास व्यवहार करत होता. मोठ्या शेअर्सच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये फारशी हालचाल दिसली नाही.

निफ्टीतील शेअर्सकडे पाहिल्यास टायटनमध्ये तब्बल 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि तो आजचा टॉप गेनर ठरला. दागिन्यांच्या विक्रीत झालेल्या जोरदार वाढीचा थेट फायदा या शेअरला झाला. याशिवाय अपोलो हॉस्पिटल्स, हिंदल्को, इन्फोसिस, HCL टेक आणि विप्रो या शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून आली. दुसरीकडे HDFC बँकेचा शेअर आजही घसरला. . त्याचप्रमाणे सिप्ला, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व, ONGC आणि काही ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली.

आज शेअर बाजारात संमिश्र चित्र दिसत आहे. कंझ्युमर ड्युरेबल्स, मेटल, आयटी, फार्मा, एफएमसीजी आणि हेल्थकेअर या क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली. मात्र ऑटो, NBFC, मीडिया, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच रिअल्टी क्षेत्रात घसरण झाली.

जागतिक बाजारांकडून संमिश्र संकेत मिळत आहेत. अमेरिकन बाजारांनी मंगळवारी दमदार कामगिरी केली. डाओ जोन्स सलग दुसऱ्या दिवशी सुमारे 500 अंकांनी वाढून नव्या उच्चांकावर बंद झाला. S&P 500 आणि नॅस्डॅकनेही ऑल टाइम हाय पातळी गाठली. भारतीय बाजाराला दिशा देणारा GIFT निफ्टी मात्र सुमारे 70 अंकांनी घसरलेला दिसत असून त्यामुळे देशांतर्गत बाजारात घसरणीचे वातावरण आहे.

कमोडिटी बाजारात मौल्यवान धातूंनी नवे विक्रम केले आहेत. चांदीने तब्बल 12 हजार रुपयांची वाढ घेत नवा उच्चांक गाठला, तर सोन्याचे दरही 1 लाख 39 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. सुरक्षित गुंतवणुकीची मागणी आणि औद्योगिक वापरामुळे या दरांना आधार मिळत आहे.

बेस मेटल्समध्येही तेजी कायम आहे. तांब्याने (कॉपर) नवा लाइफ हाय गाठला असून अ‍ॅल्युमिनियम चार वर्षांच्या उच्चांकावर आहे. निकेलमध्ये एका दिवसात मोठी वाढ पाहायला मिळाली.

दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड सुमारे 2 टक्क्यांनी घसरून 61 डॉलरच्या खाली आला आहे. पुरवठा वाढण्याची शक्यता आणि व्हेनेझुएलाकडून तेल उपलब्ध होण्याबाबतचे संकेत यामुळे तेलाच्या किमतींवर दबाव आहे.

Stock Market Today
India Oil Imports: भारत किती देशांकडून कच्चे तेल खरेदी करतो, त्यात व्हेनेझुएलाचा वाटा किती आहे?

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) सलग दुसऱ्या दिवशी विक्री करत सुमारे 1100 कोटी रुपये बाजारातून काढले. मात्र देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) सलग 91व्या दिवशीही खरेदी सुरू ठेवत सुमारे 1750 कोटींची गुंतवणूक केली. त्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळताना दिसत आहे.

Stock Market Today
YouTube Earnings: 5,000 व्ह्यूज मिळाले तर YouTube किती पैसे देतं? जाणून घ्या पैसे कमावण्याचं पूर्ण गणित

एकूणच आजचा बाजार जागतिक घडामोडी, कमोडिटी दरांतील चढ-उतार, FII-DII व्यवहार आणि कॉर्पोरेट अपडेट्स यावर अवलंबून राहणार असून गुंतवणूकदार सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news