
Stock Market Opening Updates
तीन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजार शुक्रवारी (दि. २० जून) सावरला. सेन्सेक्स- निफ्टीने तेजीत सुरुवात केली आहे. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढून ८१,६६० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक १०० अंकांच्या वाढीसह २४,८९० वर व्यवहार करत आहे.
इराण- इस्रायल संघर्षामुळे जगभरातील गुंतवणूकदारांच्या भावनावर परिणाम होत असतानादेखील भारतीय शेअर बाजाराने तेजीच्या दिशेने चाल केली आहे. विशेषत: बँकिंग आणि ऑटो शेअर्समधील तेजीमुळे बाजारातील वाढीला आधार मिळाला आहे. क्षेत्रीय निर्देशांकातील निफ्टी बँक, फायनान्सियल, ऑटो, पीएसयू बँक आणि रियल्टी वधारले आहेत. तर दुसरीकडे निफ्टी आयटी, ऑईल अँड गॅस निर्देशांकावर दबाव दिसून आला.
सेन्सेक्सवर एम अँड एम, इर्टनल, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, एसबीआय हे शेअर्स वाढून खुले झाले आहेत. तर बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, कोटक बँक हे शेअर्स घसरले आहेत.
विदेशी गुंतवणूकदारांनी सलग तिसऱ्या दिवशी खरेदी कायम ठेवली. त्यांनी गुरुवारी १९ जून रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ९३४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) देखील याच दिवशी ६०५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.