Forex reserves June 2025 | भारताचा परकीय चलन साठा 696 अब्ज डॉलरवर; RBI कडे सोन्याचाही विक्रमी साठा...

Forex reserves June 2025 | भारताची अर्थव्यवस्था मजबूत, RBI ची सोन्यात गुंतवणुकीला पसंती
RBI forex reserve
RBI forex reservePudhari
Published on
Updated on

Forex reserves June 2025 RBI foreign exchange gold reserves

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ताज्या आकडेवारीनुसार, देशाचे परकीय चलन साठे (फॉरेक्स रिझर्व्ह्ज) 6 जून 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात 5.17 अब्ज डॉलरनी वाढून 696.656 अब्ज डॉलरवर पोहोचले आहेत. ही रक्कम सप्टेंबर 2024 मध्ये नोंदवलेल्या सर्वकालीन उच्चांक 704.89 अब्ज डॉलरच्या केवळ 1.2 टक्के अंतरावर आहे.

त्याआधीच्या आठवड्यात, म्हणजे 30 मे रोजी संपलेल्या आठवड्यात, फॉरेक्स रिझर्व्ह्जमध्ये 1.23 अब्ज डॉलरची घट झाली होती.

परकीय चलन मालमत्तेत वाढ

फॉरेक्स रिझर्व्ह्जचा प्रमुख घटक असलेल्या परकीय चलन मालमत्तेमध्ये (Foreign Currency Assets - FCA) $3.472 अब्जने वाढ झाली असून ती 587.687 अब्ज डॉलर झाली आहे. ही वाढ आंतरराष्ट्रीय चलनांच्या मूल्यात होणाऱ्या बदलांमुळे झाली आहे.

RBI forex reserve
8th Pay Commission Update | आठव्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? काय आहे Fitment Factor? जाणून घ्या नवा हिशोब

सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ

6 जूनपर्यंतच्या आठवड्यात, RBI च्या ताफ्यातील सोने साठा 1.583 अब्ज डॉलरने वाढून 85.888 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. 2021 पासून RBI च्या एकूण फॉरेक्स साठ्यातील सोन्याचा वाटा जवळपास दुप्पट झाला आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक मध्यवर्ती बँकांकडून "सुरक्षित गुंतवणूक" म्हणून सोन्यात वाढती खरेदी.

आयात व परकीय कर्जासाठी पुरेसा साठा

RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नुकतेच सांगितले की, सध्याचा परकीय चलन साठा भारताच्या जवळपास 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा असून देशाच्या सुमारे 96 टक्के परकीय कर्जासाठीही हा साठा सक्षम आहे.

RBI forex reserve
Global Gender Gap Index 2025 | स्त्री-पुरूष समानतेमध्ये भारताची घसरण; पाकिस्तान तळाला... संपूर्ण लिंग समानतेसाठी लागणार 'इतकी' वर्षे

मागील काही वर्षांतील ट्रेंड

  • 2022: फॉरेक्स साठ्यात 71 अब्ज डॉलरची घट

  • 2023: साठ्यात 58 अब्ज डॉलरची वाढ

  • 2024: साठ्यात सुमारे 20 अब्ज डॉलरची वाढ

RBI forex reserve
Iran Israel conflict | इराणचा 100 ड्रोनद्वारे इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ला; कठोर, वेदनादायी शिक्षा भोगावी लागेल- खाेमेनींचा इशारा

फॉरेक्स साठ्याचे महत्त्व

फॉरेक्स साठा हा देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. यामध्ये US डॉलर हे मुख्य घटक असून यामध्ये युरो, जपानी येन आणि ब्रिटिश पाउंड सारख्या इतर प्रमुख चलनांचाही समावेश असतो.

रुपयामध्ये अचानक मोठी घसरण होऊ नये म्हणून RBI वेळोवेळी डॉलर खरेदी किंवा विक्री करत चलनबदल बाजारात हस्तक्षेप करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news