

Stock Market Opening Updates
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी तेजी दिसून आली. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढून ८१,४५० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक १४० अंकांनी वाढून २४,७५० वर व्यवहार करत आहे. विशेषतः आयटी शेअर्समध्ये अधिक तेजी दिसून आली.
बाजाराची आज सपाट पातळीवर सुरुवात झाली. त्यानंतर बाजाराने तेजीच्या दिशेने चाल केली. बँकिंग शेअर्सही किरकोळ वाढ दिसून आली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी राहिली आहे.
सेक्टरल फ्रंटवर निफ्टी आयटी आणि एफएमसीजी निर्देशांक जवळपास १ टक्के वाढले आहेत. तर फार्मा आणि हेल्थेकअर निर्देशांकात घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.३ टक्के वाढले आहेत.
सेन्सेक्सवर इर्टनल, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक, टीसीएस, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत. तर दुसरीकडे सन फार्माचा शेअर्स ३ टक्के घसरून टॉप लूजर ठरला. हा एकमेव शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहे. उर्वरित सेन्सेक्सवरील ३० पैकी २९ शेअर्स हिरव्या रंगात रंगले आहेत.
निफ्टी आयटी १.८ टक्के वाढला आहे. Persistent, कोफोर्ज, टेक महिंद्रा, इन्फोसिस हे शेअर्स २ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
अमेरिकेवरील कर्जाची वाढती पातळी आणि मूडीजने नुकतेच अमेरिकेच्या पत अंदाजात घट केल्याचा दबाव जागतिक बाजारपेठांवर राहिला आहे. भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी याचा परिणाम दिसून आला होता.
ट्रेझरी यिल्डमध्ये वाढ आणि अमेरिकेतील वाढती वित्तीय तुटीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील शेअर बाजारातील तिन्ही निर्देशांक गुरुवारी सपाट झाले. दरम्यान, आज आशियाई बाजाराने तेजीत सुरुवात केली.