Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 120 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला आणि सेन्सेक्समध्ये 120 अंकांची वाढ झाली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आले. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजार हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसला. सेन्सेक्स सुमारे 120 अंकांनी वधारला, तर ऑटो आणि एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्स) क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मात्र हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स काहीसे दबावात राहिले.

इराण-अमेरिका चर्चेमुळे जागतिक बाजारांना दिलासा

इराण आणि अमेरिकेमधील संभाव्य कराराच्या चर्चेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. इराणने अमेरिकेच्या नव्या प्रस्तावावर विचार करण्याचे संकेत दिले आहेत. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही काही दिवस वाट पाहण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव काही प्रमाणात कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.

या आशावादाचा परिणाम अमेरिकन बाजारांवरही दिसला. अमेरिकेतील बाजार विक्रमी उच्चांकावर बंद झाले. डाओ जोन्स निर्देशांकात सुमारे 275 अंकांची वाढ झाली, तर नॅस्डॅक दिवसभरातील चढ-उतारानंतर किरकोळ वाढीसह बंद झाला.

GIFT Nifty मजबूत, आशियाई बाजारही तेजीत

आज GIFT Nifty सुमारे 30 अंकांच्या वाढीसह 23,670 च्या आसपास व्यवहार करत होता. डाओ फ्युचर्समध्येही जवळपास 100 अंकांची वाढ दिसून आली. त्यामुळे भारतीय बाजाराची सुरुवात मजबूत होण्याचे संकेत मिळाले. आशियाई बाजारांमध्येही सकारात्मक वातावरण दिसले, भू-राजकीय तणावामुळे अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार

इराण कराराच्या अपेक्षेमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत काल सुमारे 2% घसरण झाली होती आणि ब्रेंट क्रूड 103 डॉलरखाली बंद झाले. मात्र आज पुन्हा किंचित वाढ होऊन भाव 105 डॉलरच्या जवळ पोहोचले. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी तेलाच्या किंमती कमी होणे ही सकारात्मक बाब मानली जाते, कारण त्यामुळे महागाई आणि आयात खर्चावरचा ताण कमी होऊ शकतो.

सोने घसरले, चांदीत तेजी

कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीची दिशा वेगळी राहिली. सोन्याच्या किमतीत सुमारे 350 रुपयांची घसरण झाली, तर चांदी जवळपास 1000 रुपयांनी वधारली. बेस मेटल्समध्येही मिश्र व्यवहार दिसले. कॉपर आणि निकेलमध्ये घसरण झाली, तर अॅल्युमिनियम सलग तिसऱ्या दिवशी मजबूत राहिले.

FIIs ची विक्री सुरूच, देशांतर्गत फंडांचा आधार

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) सलग तिसऱ्या दिवशी विक्री करताना दिसले. त्यांनी एकूण सुमारे 3,097 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली. मात्र देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) बाजाराला आधार दिला आणि सुमारे 2,492 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

Stock Market Today
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलचे दर 120 रुपयांवर जाणार? तेल कंपन्यांनी दिले संकेत; ग्राहक चिंतेत

कंपन्यांच्या निकालांवर बाजाराची नजर

कॉर्पोरेट निकालांमध्ये LIC, Nykaa आणि Max Healthcare यांनी चांगली कामगिरी केली. तर Auro Pharma आणि Prestige Estates यांचे निकाल संमिश्र राहिले. GAIL चे निकाल मात्र अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिले.

आज बाजाराचे लक्ष Hindalco, Sun Pharma आणि Eicher Motors सारख्या मोठ्या कंपन्यांच्या निकालांकडे असेल. याशिवाय Colgate, Info Edge, Torrent Pharma आणि Fortis Healthcare यांच्या निकालांचाही बाजारावर प्रभाव पडू शकतो.

Stock Market Today
IPL Rule Changes: 3 विकेट घेतल्या तर मिळणार Extra Over; 100 मीटर Six ला 8 धावा, IPL चे नियम बदलणार?

Paytm मध्ये मोठ्या ब्लॉक डीलची चर्चा

Paytm मध्ये सुमारे 964 कोटी रुपयांच्या ब्लॉक डीलची शक्यता व्यक्त केली जात आहे. वृत्तानुसार Saif Partners आपली 1.3% हिस्सेदारी विकू शकते. याचा परिणाम आज Paytm च्या शेअरवर दिसू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news